Avadhoot Gupte Share Video : 'आता असह्य झालं आहे...' अवधूत गुप्तेला खुपतेय माकडांची चेष्टा; काय आहे प्रकरण?

Monkey In Avadhoot Gupte House : एक माकड अवधूतच्या घरात घुऊसून धुमाकूळ घातलं असल्याचे दिसत आहे.
Avadhoot Gupte On Makad Cheshta
Avadhoot Gupte On Makad CheshtaInstagram @avadhoot_gupte
Published On

Avadhoot Gupte Share Video Of Monkey : मराठी सिनेसृष्टीतील एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे अवधूत गुप्ते. अवधूत गुप्ते संगीतकार, गायक दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. सध्या झी मराठी वाहिनीवर अवधूत गुप्ते 'खुपते तिथे गुप्ते' या शोचे सुंत्रसंचालन करत आहे.

अवधूतने नुकताच त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक माकड त्याच्या घरात घुऊसून धुमाकूळ घातलं असल्याचे दिसत आहे.

अवधूतने व्हिडिओ शेअर करत त्या प्रसंगाचे आणि त्याच्या परिसरातील अडचणींचे वर्णन केले आहे. अवधूतने या पोस्टमध्ये सांगितले आहे की, 'अहो गुप्ते .. तुम्हाला काय खुपते? तर सध्या आम्हाला दररोज सकाळी उठून बघायला मिळणारी एक “माकड चेष्टा” खुपते!!

Avadhoot Gupte On Makad Cheshta
Sharad Ponkshe Video : मालिकेचे नुकसान होऊ नये... म्हणत शरद पोंक्षेंची ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून एक्झिट

व्हिडिओमध्ये दिसणारी ही माझी आई. हिच आम्ही दोन वर्षांपूर्वी लंग ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलंय. तर, तिच्या नाकावर टिच्चून घरात येऊन केळी पळवणारा (पळवणारा कुठला.. तिथेच बसून खाणारा!) आणि तिच्याच अंगावर धावून जाणारा हा हुप्प्या बघा! (Latest Entertainment News)

हा त्रास आमच्या बोरिवलीतल्या श्रीकृष्ण नगर मधल्या प्रत्येक रहिवाशाला आता असह्य झाला आहे! अनेकांनी वनखात्याकडे तक्रार देखील केली आहे. वनखाते देखील काही उपाययोजनांचा विचार नक्कीच करत असेल, याची मला खात्री आहे.

‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान‘ हे बाजूलाच असल्यामुळे, विविध पक्षी- प्राण्यांच्या भेटी हे खरंतर आमच्या श्रीकृष्णनगरचे आभूषण. आम्ही हे वर्षानुवर्षांपासून मिरवत देखील आलो आहोत.

Avadhoot Gupte On Makad Cheshta
Baipan Bhari Deva Box Office Collection: 'बाईपण भारी देवा'चा मोठा कारनामा, आली शॉल्लिड गुड न्यूज

पण, माकडांचा त्रास हा कोरोना पश्चात कित्येक पटींनी वाढला आहे, हे मात्र खरं! आणि याचं खरं कारण म्हणजे “त्याआधी वर्षानुवर्षे उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी या माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज्!”

ही माकडं पिढ्यानपिढ्यापासून आता ‘शंभर टक्केच्या वन्य जीवनाला‘ मुकली आहेत. झाडावर राहतात, तरी टाकीवरच्या पत्र्याखाली झोपतात.

आमच्याच झाडावरच्या तुत्या, जाम, आंबे, पेरू वगैरे फळे काढून खातात सुद्धा. पण, ते केवळ हौसे खातर! बाकी.. सकाळी घरांच्या खिडक्यातून चपात्या लाटण्याचे आवाज आणि फोडण्यांचा वास सुटला, की खिडकीच्या जाळ्यांवर येऊन ओरडाआरडा करून हक्काने हे सर्व पदार्थ मागतात. (Serial)

माकडं यायची. कोरोना आधी सुद्धा यायची. पण, महिन्या-दोन महिन्यातून चुकून भरकटत आलेली अशी. करोना काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना जायची परवानगी बंद झाली आणि त्याबरोबरच बंद झाला या माकडांचा खुराक. मग या वेळेस तो खुराक शोधत ती इथे आली आणि मग इथलीच झाली. आता ती इथेच राहतात आणि छळतात!

बाकी स्ट्रगल चालूच राहील.. फक्त यापुढे तुम्ही कुठेही फिरायला गेलात आणि माकड दिसल्यावर त्यांना काही बाही खाऊ द्यायला तुमचा हात किंवा मुलं पुढे सरसावलीच.. तर हा व्हिडिओ नक्की आठवा! एवढेच काय ते.. शुभ दिवस!

अवधूत गुप्तेने हा व्हिडीओ पोस्ट करत तो वनखाते, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि सुधीर मुनगंटीवार यांना टॅग देखील केला आहे. अवधूत गुप्तेच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला विविध उपाय सुचवले आहेत आणि सल्ले देखील आहेत. तर अवधूतच्या परिसरात राहण्यार्यांनी त्याच्या दुःखात सहभागी होत त्यांची व्यथा मांडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com