Subhedar Film: ‘आधी लगीन कोंढाण्याचं…’ इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातलं चित्र हुबेहुब डोळ्यांसमोर अवतरलं, ‘सुभेदार’ची अनोखी झलक समोर

Marathi Film: 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं' हा प्रसंग प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयावर कोरला गेला आहे.
Subhedar Film
Subhedar FilmInstagram
Published On

Subhedar Film News: सुभेदार तान्हाजी मालुसरे रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन रायगडावर गेले होते. तिथे चिंतातूर अवस्थेतील जिजाऊ आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी पाहिलं. स्वराज्यावर आलेला बाका प्रसंग ओळखून ते स्वत: कोंढाण्याच्या मोहिमेवर जायला सज्ज झाले. बेलभंडारा उचलून, हात उंचावून 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं' अशी शपथ त्यांनी घेतली. स्वामीनिष्ठेचं अजोड उदाहरण असलेला हा प्रसंग प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयावर कायमचा कोरला गेलेला आहे.

Subhedar Film
Dil Bechara Out : नेहा - रोहनप्रीतने अनेक तरुणांच्या दर्दभऱ्या भावना मांडल्या; क्युट कपलचं 'दिल बेचारा' रोमँटिक गाणं प्रदर्शित

तो प्रसंग हुबेहुब डोळ्यांसमोर उभं करणारं ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या कुंचल्यातून अवतरलेलं चित्र आपण बालपणी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात पाहिलं आहे. शिवकालीन इतिहास सांगणाऱ्या अनेक पुस्तकांमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. त्या गाजलेल्या चित्रावरून प्रेरित होऊन नवीन पिढीसाठी हा प्रसंग 'सुभेदार' या महत्त्वाकांक्षी आगामी चित्रपटात चलचित्ररूपात पहायला मिळणार आहे.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या टिमने प्रचंड मेहनतीने 'सुभेदार'च्या माध्यमातून शिवकालीन इतिहासातील एक सुवर्णपान रसिकांसमोर उलगडण्याचं काम केलं आहे. १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय पूरकरांनी सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांच्या जोडीला चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Subhedar Film
Dream Girl 2 Ayushman Khurana Look: कातील नजर, सौंदर्याचा कहर, आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ चा फर्स्ट लूक एकदा पहाच

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या 'सुभेदार' चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड 'सुभेदार' चित्रपटाचे निर्माते आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com