Dream Girl 2 Ayushman Khurana Look: कातील नजर, सौंदर्याचा कहर, आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ चा फर्स्ट लूक एकदा पहाच

Dream Girl 2 Poster: २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’चा सिक्वेल येत्या २५ ऑगस्ट २०२३ला आयुष्मानचा आगामी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Dream Girl 2 Ayushman Khurana Look Revealed
Dream Girl 2 Ayushman Khurana Look RevealedInstagram
Published On

Dream Girl 2 Ayushman Khurana Look Revealed: ‘ड्रीम गर्ल’ मुळे आयुष्मान खुराना प्रकाशझोतात आला होता. त्याची चित्रपटातील पुजा ही भूमिका प्रेक्षकांना आजही चांगलीच आठवत आहे. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’चा सिक्वेल येत्या २५ ऑगस्ट २०२३ ला आयुष्मानचा आगामी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या आयुष्मानचे त्याच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत.

Dream Girl 2 Ayushman Khurana Look Revealed
Ranveer-Alia's Film Promotion in Kolkata: अरेव्वा! आलिया भट्ट इथंही आघाडीवर, इंग्लिश, हिंदीच नाही, तर आणखी एक भाषा बोलते, तेही न अडखळता!

निर्मात्यांनी ‘ड्रीम गर्ल २’च्या प्रदर्शनाच्या ठिक एक महिना आधी आयुष्मान खुरानाचा चित्रपटातील फर्स्ट लुक शेअर केला आहे. आयुष्मान खुरानाने यापूर्वी अनेकदा ‘ड्रीम गर्ल २’ चे प्रोमो शेयर केले होते. ज्यामध्ये पुजा अनेक सेलिब्रिटींसोबत आपल्याला बोलताना दिसली होती. त्यात निर्मात्यांनी शाहरुख, रणबीर, रणवीर यांच्यासोबत फोनवर गप्पा मारतानाचे टीझर शेअर केले होते. त्यावेळी त्यांनी पुजाचा चेहरा प्रेक्षकांना दाखवला होता. अखेर आज निर्मात्यांनी प्रेक्षकांना पुजाचा चेहरा दाखवला आहे. अखेर अनेक दिवसांच्या मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांची आता प्रतिक्षा संपली आहे.

आता आयुष्मान खुरानाने ‘ड्रीम गर्ल २’ मधील पूजाचा फर्स्ट लूक सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. पुजाच्या भूमिकेत प्रेक्षकांना अभिनेता आयुष्मान खुरानाच दिसणार आहे. आयुष्माननेच पहिल्या भागात पुजाचे पात्र साकारले होते. आयुष्मान खुरानाने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये आरशाच्या एका बाजूला पूजाने तिच्या हातात लिपस्टिक पकडून ती आरशात बघत आहे. तर आरशाच्या दुसऱ्या बाजूला आयुष्मान खुराना दिसतोय. पूजाची झलक शेयर करत आयुष्मानने कॅप्शन दिले की, ‘ही फक्त पहिली झलक आहे. आरशात दिसणाऱ्या वस्तू या खऱ्या दिसण्यापेक्षा सुंदर असतात.’

Dream Girl 2 Ayushman Khurana Look Revealed
Ameya Khopkar Tweet : चित्रपटउद्योग राज्याबाहेर गेले तर जबाबदार कोण ? अमेय खोपकर यांचा सरकारला सवाल

आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल २’ मधील पूजाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आयुष्मानच्या या फोटोवर चाहत्यांनी तुफान कमेंट केल्या आहेत. आयुष्मानचा लूक पाहून चित्रपटाची प्रतिक्षा आणखीणच वाढली आहे. आयुष्मानसोबत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अनन्या पांडे देखील दिसणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com