Zakir Hussain SAAM TV
मनोरंजन बातम्या

Zakir Hussain: कोट्यधीश झाकीर हुसैन यांना पहिल्या परफॉर्मेंससाठी किती रुपये मिळाले होते? आकडा ऐकून बसेल धक्का

Zakir Hussain First Income : सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचा तबला वादनाचा प्रवास कसा सुरू झाला आणि त्यांची पहिली कमाई किती होती, जाणून घ्या.

Shreya Maskar

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन(Zakir Hussain) यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 73 वर्षी अखेरचा श्वास घेतला. तबलावादक झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ मध्ये झाला होता. त्यांना तबला वादनाची कला आपल्या वडिलांकडून मिळाली. झाकीर हुसेन यांनी वयाच्या 11 व्या वर्षी आपला पहिला तबला वादनाचा कार्यक्रम केला. जो अमेरिकेत पार पडला होता.

पहिल्या परफॉर्मेंसचे पैसे किती?

झाकीर हुसेन यांनी त्यांच्या पहिल्या सादरीकरणासाठी फक्त ५ रुपये मिळाले होते आणि ते पैसे त्यांच्यासाठी खूप मोठे आणि महत्त्वाचे होते. झाकीर हुसेन यांचा पहिला पहिला अल्बम 1973 साली आला. 'लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड' या अल्बमने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली.

झाकीर हुसैन संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, झाकीर हुसेनचा एकूण संपत्ती सुमारे 1 दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय रुपयांप्रमाणे याची मोजणी केल्यास हा आकडा 8 कोटी रुपये एवढा होतो. झाकीर हुसैन आपल्या एका कॉन्सर्टसाठी जवळपास 5 ते 10 लाख रुपये घेत होते.

झाकीर हुसैन यांना मिळालेले पुरस्कार

झाकीर हुसैन यांनी आपल्या वादनाने जगाला मंत्रमुग्ध केले आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व त्यांच्या वादनाचे दिवाने होते. आजवर त्यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांना आतापर्यंत पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या कामाची छाप जगावर सोडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला चॅलेंज; निवडणुका घेऊनच दाखवा

Maharashtra Live News Update : नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा वाटप

कंबरेला स्पर्श, किस करण्याचा प्रयत्न; दिवाळीच्या जत्रेत मुलीशी छेडछाड, घटनेचा Video Viral

Shehnaaz Gill: दिवाळी स्पेशल शहनाज गिलचा क्यूट व्हेल्व्हेट अनारकलीतील लूक, पाहा PHOTO

Blackheads: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतील गायब, स्कीन करेल ग्लो; फक्त करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT