Zakir hussain : प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांची अचानक प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Zakir hussain Health update : तबला वादनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे उस्ताद झाकीर हुसैन यांची अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Zakir hussain latest news
Zakir hussain Saam tv
Published On

Zakir hussain News : प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांची प्रकृती बिघडल्याची माहीती हाती आली आहे. ७३ वर्षीय झाकीर हुसैन हे गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत राहतात. अमेरिकेत राहत असलेल्या झाकीर हुसैन यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांची आज रविवारी संध्याकाळी अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना अमेरिकेतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते बरे व्हावे, यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी प्रार्थना सुरु केली आहे. तब्येत बिघडल्यानंतर त्यांच्यावर अमेरिकेतील फ्रान्सिसको रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Zakir hussain latest news
Zakir Hussain: ११ व्या वर्षी कार्यक्रम करणाऱ्या झाकीर हुसेन यांनी कुठून शिकली तबला वादनाची कला? वाचा न ऐकलेला किस्सा

झाकीर हुसैन यांचा जन्म मुंबई झाला. झाकीर यांना लहानपणापासून तबला वाजवण्याची आवड होती. त्यांनी तबला वाजवण्याची कला त्यांच्या वडिलांकडून शिकली आहे. तीन वर्षांचे असताना झाकीर यांना तबला शिकण्यास सुरुवात केली. झाकीर हे ७ वर्षांचे झाले, तेव्हा त्यांचा पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Zakir hussain latest news
Raj Kapoor 100th Birth Anniversary: भारतच नाही तर पाकिस्तानमधील 'या' ठिकाणी देखील साजरा केली राज कपूर यांची जन्मशताब्दी

वयाच्या ११ व्या वर्षापासून झाकीर यांनी कार्यक्रमासाठी दौरे सुरु केले. यानंतर माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी झाकीर यांना आमंत्रण दिलं होतं. या कार्यक्रमात प्रवेश मिळवणारे पहिले भारतीय होते.

काही दिवसांपूर्वी झाकीर हुसैन यांची भारताच्या एका दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. झाकीर हुसैन यांचा हा दौरा पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी २०२५ मध्ये सुरु होणार आहे. झाकीर हुसैन येणार असल्याने अनेक चाहत्यांच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत.

Zakir hussain latest news
Genelia : जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे! देशमुखांच्या घरी नाताळची जय्यत तयारी सुरू, रितेशनं मुलांसह सजवला ख्रिसमस ट्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com