Saif Ali Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan : सैफची प्रकृती कशी? जनरल वॉर्डमध्ये कधी हलवणार? जाणून घ्या हेल्थ अपडेट

Saif Ali Khan Health Update : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता सैफची प्रकृती कशी आहे, जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) चाकूने हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर सैफला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी त्याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केले. सैफवर त्याच्या वांद्रे येथील घरामध्ये हल्ला करण्यात आला. ही घटना मध्यरात्री घडली. सैफवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. चोरीच्या उद्देशने चोर घरात शिरले होते.

सैफ अली खान हेल्थ अपडेट

सैफ अली खानला शस्त्रक्रिया झाल्यानंतर आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतरच अभिनेत्याचा जबाब नोंदवण्यात येणार, असे पोलीसांनी सांगितले. सैफ अली खान आपल्या जबाबात नक्की काय सांगतो? त्याने आरोपीला पाहिलं होतं का आणि पाहिल असेल तर ताब्यात घेतलेला आरोपी तोच आहे का असे अनेक प्रश्न त्याला विचारण्यात येण्याची शक्यता आहे.

डॉक्टरांनी काय सांगितले?

नुकतीच डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेऊन सैफ अली खानचा हेल्थ अपडेट दिला आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सैफची प्रकृती आता स्थिर आहे. त्याला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले आहे. सैफने चालण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्याला नुकतेच आयसीयूमध्ये स्पेशल रुममध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात आणले होते. सैफ अली खानला आता विश्रांतीची गरज आहे. पाठीवर खोल जखम झाली असल्यामुळे बेडरेस्ट सांगण्यात आला आहे.

सैफ अली खानवर हल्ला मध्यरात्री अडीच ते तीन वाजल्याच्या सुमारास झाला. चोरासोबतच्या झटापटीत सैफवर सहा ते सात वेळा चाकून वार करण्यात आले. यामुळे तो गंभीर जखमी झाला. सेफवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी एका व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र हा तोच चोर आहे का? याचा खुलासा अद्याप झाला नाही. या संदर्भात पोलीस सेफशी बोलणार आहे. सैफ अली खानशी बोल्यानंतरच सर्व प्रकरणाचा खुलासा होईल आणि गुन्हेगाराची ओळख पटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

SCROLL FOR NEXT