Attack On Bollywood Celebrity: फक्त सैफ अली खानच नाही तर बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटींवरही झालेत हल्ले, पाहा लिस्ट

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. याआधी देखील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर असे हल्ले करण्यात आले आहेत. याची संपूर्ण यादी जाणून घेऊयात.
Saif Ali Khan Attack
Attack On Bollywood CelebritySAAM TV
Published On

सध्या बॉलिवूडमधील वातावरण बिघडलेले पाहायला मिळत आहे. एकामागोमाग अनेक बॉलिवूड स्टारवर हल्ले होताना पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वी सलमान खानवर हल्ला करण्यात आला आणि आता बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला. ज्यात अभिनेता गंभीर जखमी झाला. सैफ आणि सलमान व्यतिरिक्त याआधी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर हल्ले झाले आहेत. त्यांची यादी पाहूया.

सैफ अली खान

नुकताच सैफ अली खानवर (Saif Ali Khan) मध्यरात्री चोराने चाकूने वार करून हल्ला करण्यात आला. यात अभिनेता गंभीर जखमी झाला आणि त्याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली.

सलमान खान

आजवर सर्वात जास्त बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला अनेक वेळा टार्गेट करण्यात आले आहे. सलमान खानला गेल्या अनेक महिन्यांपासून लॉरेन्स विश्नोई टोळीकडून धमक्या येत आहे. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबारही झाला आहे.

गुलशन कुमार

टी-सीरीजचे मालक गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली होती. ते मुंबईतील अंधेरी येथील शिवमंदिरात जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांची हत्या होण्याआधी त्यांना धमकीचा फोन आला होता. 12 ऑगस्ट 1997 त्यांच्यावर हल्ला झाला.

राकेश रोशन

'कहो ना प्यार है' या चित्रपटाच्या यशानंतर अंडरवर्ल्डकडून राकेश रोशनना अनेक वेळा टार्गेट करण्यात आले. त्यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली. 21 जानेवारी 2000 मध्ये राकेश रोशनवर त्यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली.

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानला अनेक वेळा अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या आहेत. वाढत्या धमक्यामुळे शाहरुख खानच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेण्यात आली.

प्रीती झिंटा

बॉलिवूडची अभिनेत्री प्रीती झिंटाला अंडरवर्ल्डकडून टार्गेट करण्यात आले आहे. तिला ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोनही आले होते. ही घटना 2001 मध्ये रिलीज झालेल्या 'चोरी चोरी चुपके चुपके' या चित्रपटानंतर ही घटना घडली.

मुश्ताक खान

मुश्ताक खानला यूपीमध्ये एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले तेव्हा त्यांचे अपहरण झाले. तसेच त्यांच्या मोबाईलवरून दोन लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले.

सुनील पाल

काही दिवसांपूर्वी खंडणीसाठी कॉमेडियन सुनील पाल यांचे अपहरण करण्यात आले होते. मात्र त्यांनी आपला जीव वाचवून पुन्हा मुंबईत आले.

रवीना टंडन

बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्री रवीना टंडनवर देखील महिलांनी हल्ला केला आहे. रवीना टंडन आपल्या घराखाली करने जात असताना दोन महिलांनी तिची कार थांबवून तिला मारण्याचा प्रयत्न केला. याची रवीनाने पोलीस तक्रार केली.

संजय लीला भन्साळी

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटावरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. राजपूत समाजाच्या अपमानाच्या मुद्यावरून त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्या थोबाडीत मारण्यात आली होती.

Saif Ali Khan Attack
Saif Ali Khan Attack: सैफवर हल्ला कसा झाला? मोलकरणीने पोलिसांना सांगितला थरारक घटनाक्रम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com