Jennifer Lopez Buy Isha Ambani House Saam Tv
मनोरंजन बातम्या

Isha Ambani ने अमेरिकेच्या गायिकेला विकला ५०० कोटींचा आलिशान बंगला; १२ बेडरूम-जिम-सलूनसह आहेत या सुविधा

Jennifer Lopez Buy Isha Ambani House: ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांनी अमेरिकेच्या (America) लॉस एंजिल्समध्ये असलेला आलिशान बंगला विकला. त्यांनी हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका जेनिफर लोपेजला (Jennifer Lopez) आपला बंगला विकला.

Priya More

Hollywood Singer Jennifer Lopez:

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) आपल्या आलिशान बंगल्यामुळे चर्चेत आहे. ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांनी अमेरिकेच्या (America) लॉस एंजिल्समध्ये असलेला आलिशान बंगला विकला. त्यांनी हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका जेनिफर लोपेजला (Jennifer Lopez) आपला बंगला विकला. जेनिफरने ५०० कोटी रुपयांना हा बंगला खरेदी केला. या बंगल्यामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त सुविधा आहे.

जेनिफरने खरेदी केलेला हा बंगला खूपच आलिशान आहे. बेव्हरली हिल्सच्या अगदी मध्यभागी असलेला हा आलिशान बंगला 38,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. या बंगल्यामध्ये 12 बेडरूम, 24 बाथरूम, एक इनडोअर पिकलबॉल कोर्ट, एक जिम, एक सलून, स्पा, एक 155 फूट लांबीचा इनफिनिटी पूल, आऊट डोअर किचन आणि अनेक हिरवेगार लॉन आहे.

जेनिफरने हा बंगला मागच्या वर्षी जून महिन्यामध्येच ईशा अंबानीकडून खरेदी केला होता. जेनिफर आणि बेन यांनी हा बंगला $61 दशलक्ष म्हणजे 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. बेनने 2022 मध्ये त्याचे पॅसिफिक पॅलिसेड्सचे घर $28.5 दशलक्षला विकले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जेनिफरने तिची बेल-एअर मॅन्शनची मालमत्ता $34 दशलक्षला विकली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ईशा अंबानीने आपल्या प्रेग्नेंसी काळातील जास्तीत जास्त वेळ लॉस एंजेलिसमधील या बंगल्यामध्ये घालवला होता. ईशा अंबानीने २०१८ मध्ये बिझनेसमन आनंद पिरामलसोबत लग्न केले होते. मोठ्या शाही थाटामध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. आनंदचे आई-वडील अजय आणि स्वाती पीरामल यांनी त्याला मुंबईतल्या वांद्रे सी-लिंकसमोर ५० हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. १००० कोटी रुपयांचा आलिशान घर गिफ्ट केले होते.

दरम्यान, ईशाने तिची मैत्रिण प्रियंका चोप्राला तिचे लॉस एंजेलिसचे घर देखील दिले होते. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये याठिकाणी पॅन नलिनच्या 2021 गुजराती आगामी 'चेल्लो शो' चे स्क्रिनिंग होस्ट केले होते. हे ऑस्करपूर्वी आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये हा चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत भारताकडून ऑफिशियल एन्ट्री म्हणून पाठवण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT