Heeramandi मधील 'तिलस्मी बाहें' गाणं रिलीज, सोनाक्षी सिन्हाच्या अदांनी चाहत्यांना लावलं वेड

Tilasmi Bahein Song Out: काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पहिलं गाणं सकल बन रिलीज झाले होते. ज्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. आता या चित्रपटातील दुसरं गाणं 'तिलस्मी बाहें' निर्मात्यांनी रिलीज केले आहे.
Tilasmi Bahein Song Out
Tilasmi Bahein Song OutSaam Tv

Heeramandi Webseries:

बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) सध्या त्यांची आगामी वेबसीरिज हीरामंडीमुळे चर्चेत आहेत. या वेबसीरिजबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये कमालीची उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पहिलं गाणं सकल बन रिलीज झाले होते. ज्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. आता या वेबसीरिजमधील दुसरं गाणं 'तिलस्मी बाहें' निर्मात्यांनी रिलीज केले आहे. या गाण्यातील सोनाक्षी सिन्हाच्या अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे. या संपूर्ण गाण्यामध्ये सोनाक्षी सिन्हावरून नजर हटवणे कठीण झाले आहे.

'हीरामंडी' या वेबसीरिजमधील दुसरे गाणे 'तिलस्मी बाहें' रिलीज होताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहे. संजय लीला भन्साळी यांनी 'तिलस्मी बाहें' हे गाणे संगीतबद्ध केले आहे.'तिलस्मी बाहें'मध्ये ज्यापद्धतीने कथा मांडण्यात आली आहे तेही वाखाणण्याजोगे आहे. संगीत आणि गाण्यासोबतच सोनाक्षी सिन्हानेही तिच्या अनोख्या अंदाजाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'हीरामंडी'च्या 'तिलस्मी बाहें' या नवीन गाण्यात सोनाक्षी सिन्हा एका आकर्षक व्यक्तिरेखा म्हणून दिसत आहे. सोनेरी साडी, गळ्यात डायमंड नेकलेस आणि कुरळे केस या लूकमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे. हातात ड्रिंक आणि सिगारेट घेऊन मेळाव्याच्या मध्यभागी बसलेली दिसते. गाण्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोनाक्षी सिन्हा आपली नजर हटू देत नाही.

Tilasmi Bahein Song Out
Adah Sharma: अदा शर्माचा १५ रुपयांच्या साडीमध्ये स्टनिंग लूक, VIDEO पाहून चाहते झाले आश्चर्यचकीत

भारतीय ओटीटी जगतात संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहे. 'हीरामंडी' वेबसीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हासोबतच मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी आणि संजीदा शेख महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या वेबसीरिजमध्ये प्रेम, शक्ती आणि स्वातंत्र्य यांच्यातील लढाई पाहायला मिळणार आहे. यासोबतच हिरामंडीमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताची झलकही दाखवण्यात येणार आहे.हीरामंडी वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Tilasmi Bahein Song Out
निलेश साबळे-भाऊ कदमसह ओंकार भोजने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज, 'हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' २० एप्रिलपासून भेटीला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com