Nach Ga Ghuma Teaser: मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेरावच्या 'नाच गं घुमा'चा जबरदस्त टीझर रिलीज

Mukta Barve And Namrata Sambherao Starrer Nach Ga Ghuma Movie Teaser: या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत आहेत. 'नाच गं घुमा' हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच या चित्रपटाचा जबरदस्त टीझर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे.
Nach Ga Ghuma Marathi Movie Poster
Nach Ga Ghuma Marathi Movie PosterSaam Tv

Nach Ga Ghuma Marathi Movie Teaser:

परेश मोकाशींनी २०२३ च्या सुरुवातीला 'वाळवी' (Valavi Movie) चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. या चित्रपटाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. 'वाळवी'च्या यशानंतर परेश मोकाशी 'नाच गं घुमा' (Nach Ga Ghuma Movie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनामध्ये कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत आहेत. 'नाच गं घुमा' हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच या चित्रपटाचा जबरदस्त टीझर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे.

२०२४ च्या सुरूवातीलाच परेश मोकाशींनी 'नाच गं घुमा' चित्रपटाची घोषणा केली होती. आता दिग्दर्शकांकडून चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. 'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते' या संवादाने नाच गं घुमाच्या टीझरची सुरुवात होते. या टीझरमध्ये मुक्ता आणि नम्रता यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळत आहे. त्याचसोबत चिमुकल्या मायरा वायकुळने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

Nach Ga Ghuma Marathi Movie Poster
Heeramandi मधील 'तिलस्मी बाहें' गाणं रिलीज, सोनाक्षी सिन्हाच्या अदांनी चाहत्यांना लावलं वेड

मुक्ता बर्वेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत मुक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'महाराणी आणि परीराणीच्या विश्वात सामील व्हायला तयार आहात ना? सादर आहे ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा टीझर... हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ १ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात...' मुक्ता बर्वेच्या या पोस्टला चाहत्यांनी पसंती दिली आहे.

'नाच गं घुमा' चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी असून चित्रपटाचा निर्माता स्वप्नील जोशी आहे. या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, आशा गोपाल, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत मुख्य भू्मिकेत आहे. तर या चित्रपटामध्ये बालकलाकार मायरा वायकुळही दिसणार आहे. या चित्रपटाची कथा महाराणी- परीराणीची या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्त्रियांच्या विविध स्वभाववैशिष्ट्यांवर, गमती-जमतींवर आधारित हा चित्रपट आहे. नुकतेच चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Nach Ga Ghuma Marathi Movie Poster
Parampara Movie: 'परंपरा' २६ एप्रिलला येणार भेटीला, मिलिंद शिंदे आणि वीणा जामकर मुख्य भूमिकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com