Actor Bernard Hill Passes Away At The Age Of 79 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Bernard Hill Dies : 'टायटॅनिक' चित्रपटातला कॅप्टन काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actor Bernard Hill Passes Away At The Age Of 79 : १९९७ मध्ये रिलीज झालेल्या ‘टायटॅनिक’ चित्रपटात कॅप्टनचे पात्र साकारलेल्या अभिनेते बर्नाड हिल यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे.

Chetan Bodke

१९९७ मध्ये रिलीज झालेल्या ‘टायटॅनिक’ चित्रपटात कॅप्टनचे पात्र साकारलेल्या अभिनेते बर्नाड हिल यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. ह्या हॉलिवूड अभिनेत्याचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झालेले आहे. बर्नार्ड हिल यांच्या निधनामुळे चाहत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही आणि सेलिब्रिटी मित्रांना धक्का बसला. अभिनेत्री आणि बर्नार्ड हिलची सहअभिनेत्री बार्बरा डिक्सन यांनी अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त दिले आहे.

बर्नाड हिल यांनी आपल्या सिनेकारकिर्दित 'टायटॅनिक' आणि 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' सारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे. अभिनेत्री बार्बरा डिक्सन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केलेली आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "बर्नार्ड हिल यांच्या निधनाचे वृत्त मी अतिशय जड अंत:करणाने सांगत आहे. १९७४ मध्ये विली रसेलच्या 'जॉन पॉल जॉर्ज रिंगो अँड बर्ट' या शोमध्ये आम्ही दोघांनीही एकत्रित काम केले होते. तो एक अप्रतिम अभिनेता होता. त्यांच्यासोबत काम करणे ही बाब माझ्यासाठी खास होती. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो."

बर्नार्ड हिल यांचे निधन नेमके कोणत्या कारणाने झाले आहे, हे समजू शकलेले नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याचे मॅनेजर लू कोल्सन यांनी रविवारी (५ मे) सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. बर्नार्ड हिल यांनी 'टायटॅनिक' चित्रपटामध्ये, 'कॅप्टन एडवर्ड स्मिथ'ची आयकॉनिक भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक फक्त हॉलिवूड सिनेसृष्टीतच नाही तर जगभरामध्ये त्यांचे कौतुक झाले होते. याशिवाय 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' चित्रपटातूनही त्यांना विशेष ओळख मिळाली आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केवळ चित्रपटच नाही तर टीव्ही शो आणि थिएटरमध्येही काम केले आहे.

बर्नाड हिल यांच्या 'टायटॅनिक' आणि 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' या दोन्ही चित्रपटांना ११ ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सोशल मीडियावर, त्यांचे जगभरातील चाहते बर्नार्डने साकारलेल्या पात्रांची आठवणी शेअर करत आहे. त्याच्या अभिनयाचेही सध्या चाहते कौतुक करीत आहेत. अभिनेत्याच्या मृत्यूने मात्र चाहत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kamali: कमळी मालिकेत नवा ट्विस्ट; थिएटरमध्ये कमळीची छेड काढल्यामुळे ऋषीचा संताप अनावर, दोघांच्या नात्याला मिळणार नये वळण

Voter List Scam: महाराष्ट्र, कर्नाटकानंतर केरळातही घोळ; एकाच पत्त्यावर ९ जणांची बनावट मतदार नोंदणी

Maharashtra Live News Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सरीना सुरूवात

Cabinate Decision: रेशन दुकानदारांना आता क्विंटलमागे १७० रुपये मार्जिन; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, पाहा, VIDEO

Voter List Scam : दोनच मतदार असताना एकाच घरात दाखवले ११९ मतदार; चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीतील घोटाळा उघड

SCROLL FOR NEXT