होळी (Holi 2025) या सणाची लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण वाट पाहत असतो. अखेर हा सण आता आला आहे. होळीच्या रंगात रंगण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. होळीला रंगपंचमीसोबतच पुरणपोळीचा बेत आखला जातो. दुपारपर्यंत होळी खेळल्यावर आपण घरी येऊन पुरणपोळीवर ताव मारतो. होळीची संध्याकाळ भन्नाट मनोरंजनाची जाण्यासाठी दमदार हिंदी चित्रपटांची यादी आताच नोट करा. होळीला आवर्जून टॉप १० हिंदी चित्रपट (Top 10 Hindi Movies For Holi) आपल्या कुटुंबासोबत तसचे मित्रमंडळींसोबत घरबसल्या पाहा.
शोले
सर्वात गाजलेला 'शोले' हा चित्रपट होळीला आवर्जून पाहा. चित्रपट पाहता पाहता सिनेमातील डायलॉग बोलण्याची मजाच भारी आहे. 'होली के दिन दिल खिल जाते हैं' हे गाणे चित्रपटात ऐकायला मिळेल.
मोहब्बतें
होळीत प्रेमाच्या रंगात रंगून जा. 'सोनी सोनी आखियों वाली' गाण्यावर घरबसल्या शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायसोबत बेभान होऊन डान्स करा. जोडप्यांनी तर हा चित्रपट पाहाच.
ये जवानी है दीवानी
तरुणांचा आवडता 'ये जवानी है दीवानी' चित्रपट पाहिल्याशिवाय होळीचा सण पूर्ण होणार नाही. तुमच्या मित्रांसोबत नक्कीच हा चित्रपट पाहा. चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणची हटके जोडी पाहायला मिळते.
गोलियों की रासलीला- रामलीला
बॉलिवूडच्या पावर कपलचा 'गोलियों की रासलीला- रामलीला' हा चित्रपट होळीला आवर्जून पाहा. 'लहू मुँह लग गया' हे गाणे 'गोलियों की रासलीला- रामलीला' या चित्रपटात आहे. चित्रपटातील या दोघांची केमिस्ट्री भन्नाट आहे.
सिलसिला
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 'सिलसिला' चित्रपट होळीला आवर्जून पाहा. होळीचे सर्वात लोकप्रिय गाणे रंग 'बरसे...' हे याच चित्रपटातील आहे.
बागवान
होळीला स्पेशल पाहिला जाणारा चित्रपट म्हणजे 'बागवान' होय. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी एकत्र पाहायला मिळत आहे.
बद्रीनाथ की दुल्हनिया
बॉलिवूडचे सुपस्टार वरुण धवन आणि आलिया भट्ट यांचा 'बद्रीनाथ की दुल्हनिया' चित्रपट होळीला आवर्जून पाहा. यात तुम्हाला वरुण आणि आलियाची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळेल.
रांझना
सोनम कपूर आणि धनुषसोबत होळीच्या रंगात रंगून जा. घरबसल्या 'रांझना' हा चित्रपट पाहा. 'रांझना' चित्रपटात प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.
कटी पतंग
हिंदी चित्रपट 'कटी पतंग'मधील "आज ना छोड़ेंगे" या गाण्यावर होळीला तुफान डान्स करा. सोबत चित्रपट देखील पाहा. आजही या चित्रपटाचा मोठा चाहता वर्ग आहे. राजेश खन्ना यांनी चित्रपट गाजवला आहे.
दयावान
माधुरी दीक्षितचा 'दयावान' होळीच्या सुट्टीत आवर्जून पाहा. या चित्रपटातील 'दिवानी तुम जवानों की' हे गाणे जुन्या आठवणींना उजाळा देईल. चित्रपटाच्या पार्श्वभूमी प्रेम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.