Namdeo Dhasal : "तुम्ही घाटी लोक चित्रपट कशाला काढता...", नामदेव ढसाळांच्या कुटुंबीयांचा सेन्सॉर बोर्डाकडून अपमान

Namdeo Dhasal Family Gets Humiliating Treatment : नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबीयांना सेन्सॉर बोर्डाकडून अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात.
Namdeo Dhasal Family Gets Humiliating Treatment
Namdev DhasalsSAAM TV
Published On

कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ (Namdev Dhasals) यांच्या चित्रपटावरून सध्या वाद सुरू झाला आहे. चित्रपटात कविता वापरण्यावरून हा वाद निर्माण झालाय. तर दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाने 'कोण नामदेव ढसाळ?' अशा प्रश्न करून नवीन वादाला सुरूवात केली आहे. नामदेव ढसाळांच्या पत्नीने असा खुलासा केला की, 'चल हल्ला बोल' चित्रपटात दिग्दर्शकाने कोणतीही परवानगी न घेता नामदेव ढसाळांच्या कवितांचा वापर केला आहे.

विद्रोही कवी नामदेव ढसाळांच्या जीवनावर आधारित 'चल हल्ला बोल' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील सर्व कविता काढून सिनेमा प्रदर्शित करावा अशी अट निर्मात्यांसमोर ठेवली आहे. तर आता नवीन एक वाद सुरू झाला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी नामदेव ढसाळांच्या कुटुंबीयांना अपमानास्पद वागणूक दिली आहे.दलित पॅंथरच्या केंद्रीय सचिव संगीता ढसाळ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडिया तुफान व्हायरल होत आहे. ज्यात असे दिसत आहे की, ढसाळ यांच्या कुटुंबीयांना कार्यालयात बोलवून धमकावण्यात आले आहे.

सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यांची वर्तणूक

सेन्सॉर  बोर्डच्या अधिकाऱ्यांनी ढसाळ यांच्या कुटुंबीयांना कार्यालयात बोलवून त्यांचे फोन घेतले. तसेच त्यानंतर गेल्यावर कोण नामदेव ढसाळ? तुम्ही त्यांचे कोण लागता? असे प्रश्न केले. असे विचारून सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यांनी ढसाळ यांच्या कुटुंबीयांचा अपमान केला. व्हिडीओत संगीता ढसाळ म्हणाल्या म्हणाल्या की, "त्यांनी आम्हाला बोलावलं होते म्हणजे त्यांना सर्व माहिती होते. फक्त आमचा अपमान करण्यासाठी असे प्रश्न त्यांनी विचारले. " सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्याने यावर असे उत्तर दिले की, "मी राजस्थानला असतो. मी 2 दिवसांपूर्वी मी इथे आलो, मी राजपूत आहे. "

व्हिडीओत संगीता ढसाळ बोलतात की," ज्या विषयाने महाराष्ट्र पेटलाय त्याबद्दल यांना माहिती कशी नाही. नामदेव ढसाळ कोण? असे म्हणणारे माफी का मागत नाही? संगीता ढसाळ यांनी विचारल्यावर अधिकारी म्हणाले की, "असे काही झालेच नाही. " सीसीटीव्ही तपासण्यावर देखील अधिकाऱ्यांनी नकार दिला. तुम्ही मराठी दलित लोक कशाला काढतात चित्रपट? काय गरज आहे? असा देखील प्रश्न संगीता ढसाळ यांना अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. तसेच पुढे "तुम्ही घाटी लोक चित्रपट कशाला काढता..." असे देखील विचारण्यात आले.

व्हिडीओत संगीता ढसाळ यांनी सांगितले की, सेन्सॉर बोर्डला नामदेव ढसाळ यांच्यासोबतच मराठी भाषेवरही आक्षेप आहे. मराठी बोलणारे खूप कमी आहेत. तुमच्या मराठी चित्रपटाला कोण ओळखणार नाही. असे त्यांचे म्हणणे आहे. तुम्ही हल्ले करा आणि आम्ही तुम्हाला आत टाकतो अशी भूमिका सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यांची आहे. शेवटी संगीता ढसाळ यांनी सामान्य जनतेने काय करायचे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Namdeo Dhasal Family Gets Humiliating Treatment
kedar shinde : ...तर मी शून्य, केदार शिंदेंची महिला दिनानिमित्त खास पोस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com