Shruti Vilas Kadam
कवी कलश मुळचे उत्तर प्रदेश येथील कनोजी ब्राम्हण.
आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी महाराजांनी बालशंभूराजेंना मथुरेत ठेवल होतं तेव्हा त्यांची आणि कवी कलशाची पहिली भेट झाली.
कवी कलशा यांना छंदोगामत्य ही पदवी बहाल केली.
संभाजी राजांच्या गैरहजेरीत शहाबुद्दीन खानाचे रायगडावरील आक्रमण वेशीवरच मोडुन काढले.
संभाजी महाराजांचा कवी कलशांवर इतका विश्वास होता की ते शेवटपर्यंत सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत राहिले.
कवी कलशांनी संभाजी महाराजांवर एक काव्य रचलं होतं आणि साखळदंडानी बंदिस्तअशा अवस्थेत औरंगेजेबासमोर ते म्हणूनही दाखवलं होतं
यावन रावन की सभा संभु बंध्यो बजरंग,
लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग,
ज्यो रबी छबि लखतही खद्योत होत बदरंग,
त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग …
आजही तुळापुर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी शेजारी कवीराज कलश यांची देखील समाधी उभी आहे.