'सेन्सॉर बोर्डावर कारवाई करा', नामदेव ढसाळांच्या पत्नीची मागणी; नेमकं प्रकरण काय?

Namdev Dhasal Censor Board Case : एकीकडे सेन्सॉरनं WHO IS नामदेव ढसाळ विचारुन नव्या वादाला तोंड फोडलं. त्यातच नामदेव ढसाळांच्या पत्नीनं ‘चल हल्ला बोल’ चित्रपटाविषयी देखील मोठा खुलासा केलाय.
Namdev Dhasal wife Mallika Sheikh demands
Namdev Dhasal wife Mallika Sheikh demands Saam Tv News
Published On

मुंबई : बंडखोर कवी आणि दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या कविता सिनेमात वापरण्यावरून वाद निर्माण झालाय. ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका शेख यांनी काय आक्षेप घेतलाय आणि सेन्सॉर बोर्डाला काय इशारा दिलाय त्यावरचा विशेष रिपोर्ट.

पद्मश्री, विद्रोही कवी नामदेव ढसाळांच्या जीवनावर आधारित 'चल हल्ला बोल' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारलीये. धक्कादायक बाब म्हणजे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील सर्व कविता काढून मगच प्रदर्शित कराव्यात अशी अट निर्मात्यांसमोर ठेवली. इतकच नाही तर त्यांनी थेट 'कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही' असा सवाल नोटीसमध्ये विचारल्याने संताप व्यक्त होत असतानाच आता नामदेव ढसाळांची पत्नी मल्लिका ढसाळ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Namdev Dhasal wife Mallika Sheikh demands
शेतकऱ्यांचे पैसे परप्रांतियांनी लाटले, पीएम किसान योजनेतील धक्कादायक प्रकार; नाशिकमध्ये संतापजनक प्रकार

एकीकडे सेन्सॉरनं WHO IS नामदेव ढसाळ विचारुन नव्या वादाला तोंड फोडलं. त्यातच नामदेव ढसाळांच्या पत्नीनं ‘चल हल्ला बोल’ चित्रपटाविषयी देखील मोठा खुलासा केलाय. दिग्दर्शकानं कोणतीही परवानगी न घेता नामदेव ढसाळांच्या कविता वापरल्याचा खुलासा त्यांनी केलाय.

चित्रपटाचं नेमकं प्रकरण काय आहे पाहूया

चल हल्ला बोल का वादात?

चित्रपट 1 जुलै 2024 रोजी मान्यतेसाठी सेन्सॉरकडे

चित्रपटातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचं सेन्सॉरचं मत

कविता नामदेव ढसाळांनी लिहिल्याची माहिती दिग्दर्शकाकडून सादर

अधिकाऱ्यांचं, ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असं उत्तर

Namdev Dhasal wife Mallika Sheikh demands
Pune Crime News : बलात्कार नाही, व्यवहार होता? दत्ता गाडेच्या वकिलांचा दावा

दलित साहित्यात परिवर्तन घडणारे गोलपीठाकार नामदेव ढसाळांनी केलेल्या अतुलनीय कामासाठी त्यांना 1999 साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. मात्र आता चल हल्ला बोलच्या निमित्तानं ढसाळ पुन्हा चर्चेत आलेत. त्यानिमित्तानं तरी नव्या पिढीला who is ढसाळ या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी आशा आहे.

Namdev Dhasal wife Mallika Sheikh demands
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडच हत्येचा मास्टरमाईंड; कराडच सुत्रधार, मुंडे अडकणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com