Holi 2025 Marathi Songs : 'आला होळीचा सण लई भारी...' धुळवडीला टॉप १० मराठी गाण्यांवर बेभान होऊन नाचा

Top 10 Marathi Songs for Holi : रंगांची उधळण आणि मराठी गाण्याच्यासोबतीने होळीला धमाल मजा करा. टॉप १० मराठी गाण्याची यादी आताच जाणून घ्या. रंगपंचमीला प्रसिद्ध मराठी गाण्यावर भन्नाट डान्स करा.
Top 10 Marathi Songs
Holi 2025 Marathi SongsSAAM TV
Published On

होळी (Holi 2025) हा अनेकांचा आवडता सण आहे. आयुष्यातील नकारात्मकता दूर करून होळीच्या रंगात रंगून जीवनात नवीन रंग भरण्याची सकारात्मक प्रेरणा हा सण आपल्याला देतो. यंदा धुळवडीचा सण 14 मार्च 2025 ला आला आहे. रंगपंचमीला रंगांसोबत खेळायला आणि होळीचा गाण्यांवर मनसोक्त नाचायला अनेकांना आवडते. होळीला भन्नाट गाण्यांची साथ मिळाली तर होळीचा रंग वाढतो. म्हणूनच होळी स्पेशल टॉप १० मराठी गाण्यांची (Top 10 Holi Marathi Songs) यादी आताच नोट करा.

होळी स्पेशल टॉप १० मराठी गाणी

आज गोकुळात रंग खेळतो हरी

'आज गोकुळात रंग खेळतो हरी' हे गाणे होळीची रंगत वाढवते. हे गाणे श्रीकृष्ण आणि राधेच्या गोकुळातील लीला यांवर आधारित आहे. हे गाणे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायले आहे.

अगं नाच नाच राधे उधळूया रंग

'अगं नाच नाच राधे उधळूया रंग' हे गाणे मराठी चित्रपट 'गोंधळात गोंधळ' यातील आहे. हे गाणे गायक सुरेश वाडकर यांनी गायलं आहे.

आला होळीचा सण लई भारी

'आला होळीचा सण लई भारी' हे गाणे मराठी चित्रपट 'लय भारी' यातील आहे. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुखने जबरदस्त अभिनय केला आहे. अजय-अतुलने या गाण्याला संगीत दिले आहे.

Top 10 Marathi Songs
Riteish Deshmukh : "...घरात मी जिनिलीयाचा गुलाम", रितेश देशमुख असं का म्हणाला? पाहा VIDEO

खेळताना रंग बाई होळीचा

'खेळताना रंग बाई होळीचा' या गाण्याने तर होळीला धुमाकूळ घातला जातो. हे गाणे ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांनी गायले आहे.

धुवून टाक

रितेश देशमुखच्या 'माऊली' चित्रपटातील 'धुवून टाक' या गाण्याने तर भुरळ घातली आहे. या गाण्यावर बेभान नाचल्याशिवाय होळी पूर्ण होत नाही. हे गाणे अजय-अतुल यांनी गायले आहे.

चला होळीचा खेळाला रंग

'चष्मेबहाद्दर' चित्रपटातील 'चला होळीचा खेळाला रंग' या गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली आहे. हे गाणे किशोर कुमार आणि लता मंगेश्कर यांनी गायले आहे.

होळी आली

'होळी आली' हे गाणे 'कळतंय पण वळत नाही' या मराठी चित्रपटातील आहे. हे गाणे सुबोध बांद्रेकर आणि पूर्णिम यांनी गायले आहे. होळीत या गाण्यावर नाचायला वेगळीच मजा आहे.

सख्या चला बागामंदी रंग खेळू चला

'सामना' चित्रपटातील 'सख्या चला बागामंदी रंग खेळू चला' हे गाणे खरंच होळीचा रंग वाढवतो.

आली रे आली पंचिम आली

'आली रे आली पंचिम आली ' हे गाणे 'सुशीला' चित्रपटातील आहे. पूर्वीच्या काळी हे गाणे होळीसाठी खूप प्रसिद्ध होते. चित्रपटात अशोक सराफ आणि रंजना ही हटके जोडी पाहायला मिळाली आहे.

Top 10 Marathi Songs
Chhaava OTT Release : तारीख ठरली! थिएटर गाजवल्यानंतर 'छावा' ओटीटीवर येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com