बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पहिल्यांदाच हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आल्या आहे. पण आता त्यांची खासदारकी रद्द व्हावी, यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. बुधवारी (२४ जुलै) एका व्यक्तीने हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टाने कंगानाला नोटीस जारी केलेली आहे.
हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील एका व्यक्तीने कंगनाची खासदारकी रद्द व्हावी, अशी हायकोर्टात याचिका दाखल करत मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी कंगनाची निवड रद्द व्हावी, अशी मागणी याचिकेत केलेली आहे. कंगनाला हायकोर्टाकडून मिळालेल्या नोटीसमध्ये, तिने २१ ऑगस्टपर्यंत तिचं म्हणणं मांडण्याची मुदत दिलेली आहे. अभिनेत्रीला ही नोटीस वकील ज्योत्सना रेवाल यांच्याकडून पाठवण्यात आली आहे.
या याचिकेमध्ये, अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात वन विभागाचे कर्मचारी नायक राम नेगी निवडणूक लढवणार होते. राम नेगी यांना अभिनेत्री विरोधात निवडणूक लढवायची होती. पण मंडीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द केला, असं त्या याचिकेमध्ये म्हटले. त्यांनी निवडणूकीचा अर्ज भरला त्यावेळीच वीआरएस घेतली होती.
उमेदवारी अर्ज भरतेवेळी माझ्याकडून सरकारी निवासस्थानाचं वीज, पाणी आणि टेलिफोन यांचे नो ड्यूज प्रमाणपत्र आणायला सांगण्यात आलं होतं. त्यासाठी त्यांना १ दिवसाचा अवधी दिला होता. पण, दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांना ती कागदपत्रे सबमिट करायला गेलो, तेव्हा त्यांनी ते घेण्यास नकार दिला आणि माझा उमेदवारी अर्ज रद्द केला, असं नेगी याचिकेत म्हटलं आहे.
लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १०० अन्वये याचिका फेटाळली जाऊ शकते. जर याचिकाकर्त्याने नेगी यांचा उमेदवारी अर्ज बेकायदा दाखल केला होता, हे सिद्ध करण्यात अपयशी ठरले.
मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौतच्या विरोधात काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंह उभे होते. कंगनाला निवडणूकीमध्ये, ५ लाख ३७ हजार इतके मत मिळाले. तर विक्रमादित्य सिंह यांना ४ लाख २६ हजार २६७ इतके मत मिळाले. विक्रमादित्य सिंह यांचा ७४,७५५ मतांनी पराभव झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.