Bhandara News: वाघ आला रे आला..शेतकऱ्यांचा जागते रहोचा नारा, वन विभाग म्हणते रात्रीला जंगल परिसरात जावू नका

वाघ आला रे आला..शेतकऱ्यांचा जागते रहोचा नारा, वन विभाग म्हणते रात्रीला जंगल परिसरात जावू नका
Bhandara News Tiger
Bhandara News TigerSaam tv
Published On

भंडारा : वाघ आला रे वाघ आला..म्हणत जागते रहोचा नारा भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर तालुक्यातील नागरीक देऊ लागले आहेत. दुपारी म्हणा की सायंकाळच्या सुमारास बिबट आणि वाघाच्या (Tiger) दहशतीने नागरीकांसह शेतकरी भयभीत झाले आहेत. वन विभाग (Forest Department) म्हणते रात्रीला जंगल परिसरात जावू नका तर विद्युत विभाग रात्रीलाच वीज देते; शेतकऱ्यांनी काय करावे? (Tajya Batmya)

Bhandara News Tiger
Nandurbar News: आदिवासी विभागाशी मोबाईल ॲप्लिकेशन, वेबने संवाद; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील लाखांदुर तालुक्यातील वाघाच्या दहशतीत असलेलेले गावे. आताच्या घडीला रब्बी हंगाम असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजूर शेतीच्या कामासाठी शेतात जातात. घनदाट जंगलाने व्याप्त असलेल्या लाखांदुर तालुक्यात जंगली हिंस्त्र प्राण्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. बिबट, अस्वल व रानडुकरासह आता तर तालुक्यात पट्टेदार वाघांचेही दर्शन होत असल्याने शेतकरी व मजुरवर्गांना तसेच सायंकाळच्या सुमारास सायकल व दुचाकीने प्रवास करणाऱ्या वाटसरुमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे.

हिंस्त्र जंगली जनावरांचा मोठा वावर

संपूर्ण तालुक्यात गावालगतच शेती व घनदाट जंगल परिसर आहे. असा एकही रस्ता नाही की तेथून जंगल नाही. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल असल्याने हिंस्त्र जंगली जनावरांचा मोठा वावर वाढला आहे. या तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून बिबट्यांचे दर्शन प्रत्येक गावाशेजारी व शेतात होत असते. या बिबट्यांनी गायी, म्हशी, बक-या, कोंबड्यासह कुत्र्यांनाही आपले भक्ष बनविले आहे. अशा अनेक घटना घडल्या आहेत.

बंदोबस्ताची मागणी

सद्धा वाघ व बिबट्याचे दर्शन होत असल्याने या शेतकऱ्यांसह नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण पसरले आहे. वन विभागाने सतर्क राहण्याचे नागरीकांना आवाहन वनविभागाने केले आहे. मात्र शेतकरी आणि नागरीकांनी बिबट आणि वाघांचा बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com