Stree 2 Movie
Stree 2 Aaj Ki Raat Song OutSaam Tv

Stree 2 Song Out: 'स्त्री २' मधील 'आज की रात' गाणं रिलीज, तमन्ना भाटियाच्या अदांवर 'चंदेरी'वासी फिदा...

Aaj Ki Raat Song Out : पोस्टर, टीझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला 'स्त्री २' चित्रपटातलं पहिलं गाणं आलं आहे.
Published on

गेल्या अनेक दिवसांपासून राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘स्त्री २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘स्त्री’ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेक्षकांना ‘स्त्री २’ची प्रचंड उत्सुकता आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.

पोस्टर, टीझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटातलं पहिलं गाणं आलं आहे. 'आज की रात' असं गाण्याचं नाव असून या गाण्यामध्ये प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना तमन्ना भाटिया दिसणार आहे.

Stree 2 Movie
Ramen Baruah Missing : प्रसिद्ध गायक २ दिवसांपासून बेपत्ता, फोनही बंद; मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले तपासाचे आदेश

२०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटामध्ये ‘कमरिया’ गाण्यावर नोरा फतेहीने डान्स केला होता. पण आता ‘स्त्री २’ चित्रपटामध्ये आयटम साँगमध्ये तमन्ना भाटिया दिसणार आहे. चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा चित्रपटातील आयटम साँगमध्ये, तमन्ना भाटिया दिसणार अशी चर्चा सुरू होती. पण खरंतर या चर्चेवरून आता पडदा हटलेला आहे. या आयटम साँगमध्ये तमन्ना भाटिया कहर करताना दिसत असून तिच्या कातिलाना अंदाजाचीही जोरदार चर्चा होत आहे.

Stree 2 Movie
Sonali kulkarni : 'मला माझ्या नावाचा सर्वाधिक त्रास होतो...'; सोनाली कुलकर्णी असं का म्हणाली?

'स्त्री २' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी आहे. ‘स्त्री २’च्या ट्रेलरमध्ये चंदेल गावातली गोष्ट दाखवण्यात आली आहे. पुन्हा एकदा गावातल्या लोकांमध्ये ‘स्त्री’ परत आल्याची दहशत पाहायला मिळत आहे. खरंतर ‘स्त्री’ परत आल्यामुळे लोकांमध्ये, प्रचंड भीती आहे. ट्रेलरमध्ये, श्रद्धा पुन्हा एकदा स्त्रीच्या भूमिकेत दिसत असून चंदेल गावातल्या लोकांची ती रक्षा करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला चित्रपटाचं वेगळं कथानक पाहायला मिळेल.

Stree 2 Movie
Vijay Sethupathi : अरे बापरे! 'महाराजा'ने कमावले 100 कोटी; विजय सेतुपतीच्या 50 व्या सिनेमाची इतकी चर्चा का? वाचा सविस्तर

‘स्त्री’मध्ये एका महिलेची आत्मा चंदेल गावातील पुरुषांचा सूड घेते, असे दाखवण्यात आले होते. त्यानंतर तिची अपूर्ण इच्छा पूर्ण करून तिला शांत केलं जातं. आता ‘स्त्री’च्या सीक्वेलमध्ये एक पुरुष आत्मा दाखवण्यात आला आहे. तो गावातल्या मुलींना संपवण्याचा प्रयत्न करतो, असं दाखवलंय. अखेर गावकरी एका गाव गुंडाची आणि त्याच्या गँगची मदत घेताना दिसतात. या ट्रेलरमधील संवादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. कॉमेडी- थ्रिलर चित्रपटाच्या काही दृश्यांनी तुमचीही नक्कीच घाबरगुंडी उडेल.

Stree 2 Movie
Salman Khan on Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोइच्या धमकीवर सलमान खान पहिल्यांदाच बोलला; मनातलं सर्वच सांगितलं

१५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये, राजकुमार आणि श्रद्धाचा 'स्त्री २', जॉन अब्राहमचा 'वेदा' आणि अक्षय कुमारचा 'खेल खेल में' या चित्रपटाचा समावेश आहे. या तिनही चित्रपटामध्ये सर्वाधिक कमाई कोण करणार ? हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळेल.

Stree 2 Movie
Tatyana Ozolina Accident : रशियातील सर्वात सुंदर बाइकरचा रस्ते अपघातात मृत्यू, सोशल मीडियावर होते ८ मिलियन फॉलोवर्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com