Lok Sabha Elections: कंगना रणौत विरुद्ध विक्रमादित्य सिंह निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसने आणखी एक यादी केली जाहीर

Kangana Ranaut Vs Vikramaditya Singh: काँग्रेसने 16 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये कंगना रणौतच्या विरोधात विक्रमादित्य सिंह यांना मंडीतून तिकीट देण्यात आलं आहे.
कंगना रणौत विरुद्ध विक्रमादित्य सिंह निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसने आणखी एक यादी केली जाहीर
Kangana Ranaut Vs Vikramaditya SinghSaam Tv
Published On

Congress Releases Another List of 16 Candidates:

काँग्रेसने 16 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये कंगना रणौतच्या विरोधात विक्रमादित्य सिंह यांना मंडीतून तिकीट देण्यात आलं आहे. तर मनीष तिवारी यांना चंदीगडमधून तिकीट मिळाले आहे.

या यादीत काँग्रेसने पंजाबमधील एक, गुजरातमधील चार, हिमाचल प्रदेशातील दोन आणि ओडिशातील 9 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. याशिवाय गुजरातमधील पाच जागांवर होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.

कंगना रणौत विरुद्ध विक्रमादित्य सिंह निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसने आणखी एक यादी केली जाहीर
Jagan Mohan Reddy: आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर दगडफेक, हल्ल्यात जगनमोहन रेड्डी जखमी

काँग्रेसने यादी 2 एप्रिल रोजी आपली 11वी यादी जाहीर केली होती. काँग्रेसने आतापर्यंत 12 यादीत 247 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या यादीत पंजाबमधून फक्त एकाच नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने चंदीगडमधून मनीष तिवारी यांना तिकीट दिले आहे.

गुजरातबाबत बोलायचे झाले तर अहमदाबाद पूर्व मतदारसंघातून हिम्मत सिंग पटेल, राजकोटमधून परेशभाई धनानी आणि नवसारीमधून नैशाद देसाई यांना तिकीट देण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विक्रमादित्य सिंह यांना मंडीतून आणि विनोद सुलतानपुरी यांना शिमल्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. ओडिशाच्या केओंझार जागेवर मोहन हेमब्रम, बालासोरमधून श्रीकांत कुमार जेना, भद्रकमधून अनंत प्रसाद सेठी, जाजपूरमधून आंचल दास, ढेंकनालमधून सश्मिता बहेरा, केंद्रपारामधून सिद्धार्थ स्वरूप दास, जकातसिंगपूरमधून रवींद्र कुमार सेठी यांना तिकीट देण्यात आलं आहे.

कंगना रणौत विरुद्ध विक्रमादित्य सिंह निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसने आणखी एक यादी केली जाहीर
Maharashtra Politics: पवारांचा डाव, भाजपला घाव! 3 बडे नेते 'शिवरत्न'वर एकत्र येणार; माढ्यासह सोलापूरचं समीकरण बदलणार?

गुजरातमधील पाच जागांवर होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनेही उमेदवार जाहीर केले आहेत. विजापूरमधून दिनेशभाई तुलसीदास पटेल, पोरबंदरमधून राजूभाई भीमनभाई ओडेदरा, मानवदरमधून हरिभाई गोविंदभाई, खंभातमधून महेंद्रसिंह परमार आणि वाघोडियातून कनुभाई पुंजाभाई गोहिल यांना तिकीट देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com