Hemangi Kavi Diwali Special Post Instagram
मनोरंजन बातम्या

Hemangi Kavi Post: ‘कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या’; दिवाळीनिमित्त हेमांगी कवीने शेअर केली खास आठवण

Hemangi Kavi: मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर दिवाळीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Hemangi Kavi Diwali Special Post

सध्या सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य गोडाधोडाचे जेवण करत सण साजरी करत आहे. अशातच सेलिब्रिटी मंडळीही घरी दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरी करीत आहेत. नुकतेच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने मनातल्या भावना व्यक्त करत स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हेमांगी कवी आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “दरवर्षी प्रमाणे यंदाही! मला आठवतंय दुकानात, बाजारात जाऊन ‘कंदील’ निवडायची जबाबदारी मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हा पासून देण्यात आली किंवा मी ती स्वतः घेतली कारण रंगांचं ज्ञान इतरांपेक्षा टीचभर जरा बरं म्हणून. पण मग तेव्हापासून ही रीतच झाली दरवर्षी वेळात वेळ काढून मी कंदील खरेदी करायला जाते म्हणजे जातेच.” (Actress)

“खूप भारी वाटतं निरनिरळ्या पद्धतीचे कंदील पाहून! प्रत्येकाला वाटतं सगळ्यांपेक्षा वेगळा आणि हटके कंदील आपल्या दारात, खिडकीत आसावा! खरंतर कंदील इकडून तिकडून सारखेच पण आपण निवडलेला कंदील हा आपल्या पुरता का होईना स्पेशलंच असतो! पण मग इतक्या सर्व ऑप्शन्स मधून तो ‘एक’ कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या! लय कठीण! म्हणजे मी एखादी साडी पटकन निवडेन पण कंदील निवडणं is altogether different game भाई. कारण ही गोष्ट अशीय ना की ती घरातल्या प्रत्येकाला आवडायला हवी, आपली मनमानी करून चालत नाही! मला वाटलं म्हणून मी आणला असं करून नाही चालत. तर घरातल्या प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा विचार करून आणावा लागतो! निदान मी तरी असं करते! मज्जा असते सगळी! तुम्ही करता का असं?” अशी पोस्ट हेमांगी कवीने शेअर केली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT