Diwali 2023: घरच्याघरी टाकाऊपासून टिकाऊ कंदील बनवा; पाहा VIDEO

Diwali Special Lantern Making : दिवाळीसाठी तुम्ही घरच्याघरी टाकाऊ वस्तूपासून कंदील बनवू शकता.
Diwali Special Lantern Making
Diwali Special Lantern MakingSaam Tv
Published On

Lantern Making At Home:

काही दिवसात दिवाळीला सुरूवात होणार आहे. दिवाळी म्हटल्यावर सर्वत्र रोशनाई, दिव्यांची सजावट असते. दिवाळी सुरू होण्याआधीच बाजारपेठांमध्ये रांगोळी, फराळ, नवीन कपडे, कंदील दिसू लागतात.

दिवाळीला अवघे काही दिवस उरले असून बाजारात विविध रंगाचे, आकाराचे डिझाइनचे कंदील पाहायला मिळत आहे. परंतु घरी स्वतः च्या हाताने कंदील बनवण्याची मज्जा काही वेगळीच असते. घरी अगदी झटपट कंदील बनवता येतो. तुम्ही देखील घरी कंदील बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला टाकाऊ वस्तूपासून कंदील कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

साहित्य

  • कार्डबोर्ड बॉक्स

  • सोनेरी रंगाची लेस

  • रंगेबीरंगी लेस

  • वेगवेगळ्या रंगाचे गोंडे

  • फेविकॉल

Diwali Special Lantern Making
Diwali Recipe: दिवाळीसाठी बनवा पौष्टिक अन् चविष्ट कडबोळी; रेसिपी पाहा

कृती

  • सर्वप्रथम घरात असलेला जुन्या कार्डबोर्डचा बॉक्स घ्या.

  • त्या बॉक्सला चारही बाजूने मधून चौकोनी कापा. जेणेकरुन आतील बाजू स्पष्टपणे दिसेल.

  • त्यानंतर वरचा भागाला आणि खालच्या भागाला लहान चौकोनी आकारात कापून घ्या.

  • त्यानंतर बॉक्सला चारही बाजूने सोनेरी रंगाची बारीक लेस लावा.

  • लेस लावल्यानंतर खालच्या बाजूला तुमच्या आवडीची कोणतीही लेस लावा. त्यानंतर त्यावर सजावटीसाठी चारही बाजूंनी वेगवेगळ्या रंगाचो गोंडे लावा.

  • यानंतर तुम्ही बॉक्सच्या आता बल्ब किंवा लाइटिंगच्या माळा लावू शकता.

टाकाऊपासून टिकाऊ कंदील बनवण्याचा व्हिडिओ colours_creativity_space या अकाउंटवरुन शेअर केला आहे.

Diwali Special Lantern Making
Flipkart Diwali Sale: दिवाळी धमाका ऑफर! Google Pixel 7a वर तब्बल १० हजारांची सूट; वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com