दिवाळी सुरू झाल्यावर फराळ केला जातो. फराळ म्हटल्यावर त्यात अनेक चविष्ट पदार्थ बनवले जातात. शंकरपाळ्या, चकल्या, चिवडा, अनारसे, करंजी असे अनेक पदार्थ बनवले जातात. त्यातील एक पदार्थ म्हणजे कडबोळी. कडबोळी हा एक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आहे.
दिवाळीत कडबोळी पदार्थ बनवला जातो. अनेक धान्य वापरुन हा पदार्थ केला जातो. यात अनेक पौष्टिक घटक असतात. हा पदार्थ हिवाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. हा पदार्थ तुमच्या शरीरात उष्णता निर्माण करतो. आज आम्ही तुम्ही कडबोळीची झटपट रेसीपी सांगणार आहोत.
कृती
सर्वप्रथम भाजणीचे पीठ तयार करण्यासाठी तांदूळ लालसर होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर बाजरी, ज्वारी, चना डाळ, मूग डाळ, उडीद डाळ मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर ही धान्य थंड झाल्यानंतर त्याचे पीठ तयार करुन घ्या.
यानंतर एका पॅनमध्ये वाटीभर पाणी घ्या. पाण्यात आवश्यकतेनुसार मीठ टाका. त्यात हळद पावडर टाका. त्यानंतर मसाला आणि मिरची पावडर टाका. यात २ चमचे तेल टाका.
पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करावा. त्यानंतर त्यात तयार केलेले भाजणीचे पीठ टाका.
हे संपूर्ण मिश्रण मिक्स करा. त्यानंतर मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्या.
एका कढईत तेल टाका. तयार झालेले मिश्रण थोडे पाणी टाकून मळून घ्या. त्यानंतर एका विशिष्ट आकारात वळून घ्या. यानंतर तेलात तळून घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.