BMC Study: मुंबईकरांना लागलीय Unhealthy Foodची सवय; नागरिकांना भाज्या नको, पण भाजीत हवं जास्त मीठ : BMC अहवाल

BMC study: मुंबईतील ४६ टक्के रहिवाशांचे वजन जास्त आहे. यातील १२ टक्के जण लठ्ठ आहेत. १९ टक्के जणांना मधुमेहानं ग्रासले आहे.
Mumbaikars Unhealthy Food Habit
Mumbaikars Unhealthy Food Habit(DailyO)
Published On

Mumbaikars Unhealthy Food Habit:

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)कडून करण्यात आलेल्या एका अभ्यासात मुंबईकरांच्या आरोग्याविषयीची धक्कादायक बाब समोर आलीय. मुबंईकरांना आरोग्यदायी जीवन जगण्याची तातडीची गरज असल्याचं सांगण्यात आलंय. एक अंदाजे मुंबईकर दररोज ८.६ ग्रॅम मीठाचं सेवन करतात. जे शिफारस केलेल्या पेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. यामुळे जीवनशैलीशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढत असतो. (Latest News)

एका प्रौढ व्यक्तीनं दररोज साधरण ५ ग्रॅम मीठाचं सेवन केलं पाहिजे. तर त्याचप्रमाणे १० पैकी ९ मुंबईकर फळं आणि भाजीपाला खाण्यास नकार देतात. हा अहवाल बीएमसीने हे STEPS सर्वेक्षण, जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्यानं केलं आहे. या अहवालात अनेक धक्कादायक खुलासा केलाय. दरम्यान अति मीठ सेवन हे आरोग्यासाठी घातक आहे. अति मीठ सेवन केल्यानं फक्त रक्तदाब वाढत नाही तर गंभीर हृदयाचे आजार तसेच रक्तवाहिन्यासंबंधीच्या समस्या, मूत्रपिंडाचे आजार आणि त्याचबरोबर पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. जास्त मीठ खाल्ल्यानं मीठ देखील हाडांना जास्त होत असतो.

अति मीठाचं सेवन केल्यानं कॅल्शियमचे नुकसान होत असते. मीठाची चव आपल्याला आत्मसात करता येते. पण आपल्याला त्यावरील अवलंबित्व कमी करणं महत्त्वाचं आहे., असं मुंबई केईएम रुग्णालयातील एंडोक्राइनोलॉजीचे प्रमुख डॉ. तुषार बंडगर म्हणातात. बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी भारतात हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी २७ टक्के मृत्यू कशाप्रकारे होतात याची माहिती दिली.

या माहितीनुसार, २०२२ मध्ये मुंबई महानगरात नोंदणीकृत मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हृदयाशी संबंधित समस्यांमुळे झालेत. त्यात मुंबईकरांची ही अनहेल्थी खाण्याची सवय पाहिल्यानंतर आपल्याला थंडा घाम फोडण्यास पुरेसे आहे. बीएमसीच्या अहवालानुसार, मुंबईतील ४६ टक्के रहिवाशांचे वजन जास्त आहे. त्यातील १२ टक्के लोक लठ्ठ आहेत. तर ७४ टक्के लोक बसून सुस्त जीवन जगतात. त्यात अंदाजे ३४ टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि तर १९ टक्के लोकांना मधुमेहाने ग्रासले आहे.

हा अहवाल तयार करताना विविध विभागांमधील १८ ते ६९ वयोगटातील नागरिकांवर पाळत ठेवण्यात आली होती. असं बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले. हृदयाशी संबंधित आजारांशी संबंधित प्राथमिक कारणांमध्ये धूम्रपान, तंबाखूचे सेवन, फळे आणि भाज्यांचे अपुरे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव या घटकांचा समावेश होतो, असं डॉ. दक्षा शाह म्हणाल्या.

दरम्यान बीएमसीने असंसर्गजन्य आजारांविरुद्ध लढण्यासाठी भरीव पावले उचलली आहेत. ऑगस्ट २०२२ पासून, बीएमसीची वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालया विशेष सुविधां देण्यात आल्यात. मधुमेह आणि रक्तदाबासाठी २६ तपासणी केंद्रे उघडण्यात आली आहेत. या केंद्रांमार्फंत सुमारे १०.४५ लाख नागरिकांची तपासणी करण्यात आलीय. तर जानेवारी २०२३ पासून, आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांनी ३० आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांसाठी घरोघरी जाऊन त्यांची उच्च रक्तदाबाची तपासणी केलीय.

Mumbaikars Unhealthy Food Habit
Mumbai-Goa Highway: रत्नागिरी - मुंबई- गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक ठप्प

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com