Parenting Tips : मुलं हट्टी झालीत, तुमचं अजिबात ऐकत नाहीत? या टिप्स फॉलो करा, सांभाळणे होईल सोपे

Child Care Tips : कधी तरी मुलांचा हट्टी स्वभाव पूर्ण करणे ठीक आहे परंतु, एकदा का त्यांना याची सवय झाली की सतत त्या प्रमाणे वागू लागतात.
Parenting Tips
Parenting Tips Saam Tv
Published On

Child Stubborn :

वाढत्या वयात मुलांचा हट्टीपणा अधिक प्रमाणात वाढतो. त्याची मस्ती, चिडचिड करणे, कोणाचेही न ऐकणे, प्रत्येक गोष्टीत रडरड करणे यामुळे पालकांच्या नाकीनऊ येतात. परंतु, त्यांच्या या खोडकर स्वभावाला पालकांना प्रोत्साहन दिल्यास ते अधिक बिघडतात.

कधी तरी मुलांचा हट्टी स्वभाव पूर्ण करणे ठीक आहे परंतु, एकदा का त्यांना याची सवय झाली की सतत त्या प्रमाणे वागू लागतात. जर तुमच्या मुलांना वाढत्या वयात चांगले वळण लावायचे असेल तर तुम्ही एक उत्तम पालक बनायला हवे. यासाठी तुम्हाला मुलांसमोर देखील आदर्थ पालक बनायला हवे. त्यांना वळण लावताना किंवा काही शिकवताना पालकांनी चुकीच्या गोष्टी करु नये. हा स्वभाव जितक्या लवकर सुधारेल तितके चांगले, नाहीतर अशी मुले मोठी होऊनही हट्टी आणि रागीष्ट बनतात. जर तुमचे मूल देखील हट्टी असेल तर त्याला हाताळण्यासाठी या पद्धती वापरून पाहा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. समजवून सांगा

एखाद्या गोष्टीसाठी मुल (Child) हट्टपणा करत असेल तर त्याला समजावून सांगा. त्याच्यासाठी ती गोष्ट कितीपर्यंत योग्य आहे हे समजवा.

Parenting Tips
Success Tips : सकाळच्या या ८ चांगल्या सवयींमुळे कठीण मार्ग होतो सोपा, मिळते घवघवीत यश

2. रडू देणे

मुल रडू लागली की, पालक (Parenting) त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू घेऊ देतात. त्यांचा नको तो हट्ट पूर्ण करतात. परंतु, मुलांना काही गोष्टींसाठी रडू देणे पण गरजेचे आहे. काही वेळाने मुलं स्वत:हून शांत होतात.

3. दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा

मुलांना हवी ती गोष्ट मिळाली नाही की, ते चिडचिड करतात. अशावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यावेळी त्याचा स्वभाव (Behavior) तुम्हाला कळेल. ज्यामुळे येणाऱ्या प्रसंगाना तोंड देता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com