Chanakya Niti On Behaviour
Chanakya Niti On BehaviourSaam Tv

Chanakya Niti On Behaviour : आयुष्यात या लोकांपासून दूर राहा; अन्यथा करावा लागेल नकारात्मकतेचा सामना

Negative Behavior People : तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीसोबत चांगले, सकारात्मक नाते ठेवायचे असेल तर त्या व्यक्तीचे विचारही चांगले असणे आवश्यक आहे.
Published on

Behaviour Tips :

माणूस म्हटलं की त्याच्या आजूबाजूला अनेक लोक असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक नाती, वेगवेगळ्या विचारांची माणसे असतात. त्यातील काही चांगली तर काही वाईट लोक देखील असतात. याामुळे आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते.त्यामुळे वाईट माणसांपासून दूर राहणे आवश्यक असते.

आचार्य चाणक्य म्हणतात की, तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीसोबत चांगले, सकारात्मक नाते ठेवायचे असेल तर त्या व्यक्तीचे विचारही चांगले असणे आवश्यक आहे. त्यामुळे आयुष्यात सकारात्मकता येते. चाणक्यांनी माणसाच्या अशा सवयींबद्दल सांगितले आहे ज्यांच्यापासून तुम्ही लांब राहायला हवं. जाणून घेऊया त्याबद्दल  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. टॉक्सिक लोक

टॉक्सिक (Toxic) लोक हे नेहमी नकारात्मक असतात. त्यांना नेहमी आजूबाजूला जे काही घडतय त्यात त्यांना नकारात्मक गोष्टी दिसत असतात. असे लोक नेहमी काही न काही वाईट बोलत, सांगत असतात. त्यामुळे तुमच्याही मनावर तसाच परिणाम होतो. अशा लोकांपासून जरा लांब राहणे फायदेशीर आहे.

2. स्वतः च्या स्वार्थासाठी लोकांकडून काम करुन घेणारे

जगात अनेक लोक स्वार्थी (Selfish) असतात. दुसऱ्यांचा विचार न करता स्वतः ला जे हं तसं वागतात, बोलतात आणि राहतात. त्यामुळे दुसऱ्या कोणाला वाईट वाटेल याचा विचार करत नाही. स्वतः च्या स्वार्थासाठी लोकांचा वापर करुन घेतात. त्यामुळे आपल्या मनावर त्याचा वाईट परिणाम होते. अशा लोकांपासून काही अंतर ठेवणे योग्य ठरेल.

Chanakya Niti On Behaviour
Papaya Side Effects : या लोकांनी चुकूनही खाऊ नका पपई, अन्यथा...

3.खोटं वागणारे लोक

नेहमी खोटं बोलून नये, वागू नये आणि खोटं बोलणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करु नये. जे लोक सतत खोट बोलतात ते तुमचा विश्वास मोडू शकतात. त्यांच्यामुळे कदाचित तुमचा कोणावरही विश्वास बसणार नाही. त्यामुळे खोट बोलणाऱ्या लोकांपासून लांब रहावे.

4.अहंकारी लोक

ज्या लोकांमध्ये अंहकार असतो. त्यांच्यापासून लांब राहणे महत्त्वाचे आहे. हे लोक फक्त स्वतः चा विचार करतात. दुसऱ्यांबद्दल त्यांना काहीच भावना , सहानुभूती नसते. असे लोक तुमच्या भावनांचा अनादर करु शकतात. त्यामुळे त्यांचा तुमच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health) मोठा परिणाम होऊ शकतो.

Chanakya Niti On Behaviour
Most Thriller Fort In Karjat : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला काळ्या कातळातील गिरीदुर्ग, कर्जतपासून अवघ्या काही अंतरावर

5. नकारात्मक आणि निराशावादी लोक

काही लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता आणि निराशावाद असतो. त्यामुळे त्यांच्या शारिरिक आणि मानसिक ऊर्जेचा अभाव असतो. कोणतेही काम ते उत्साहाने किंवा चांगल्या पद्धतीने करु शकत नाही. या लोकांचा आपल्या आयुष्यावरही मोठा परिणाम होतो.त्यामुळे सकारात्मक राहण्यासाठी अशा लोकांपासून दूर राहणे योग्य आहे.

6. ड्रामा करणारे लोक

अनेक लोकांना लहान लहान गोष्टींसाठी सोंग घ्यायची सवय असते. खोट्या गोष्टींसाठी सोंग घेऊन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या लोकांपासून लांब राहणे फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com