कोमल दामुद्रे
महाराष्ट्राला निसर्गसौंदर्य लाभलं आहे. यामध्ये असे अनेक गडकिल्ले आहेत जे डोंगर, टेकड्यांवर वसलेले आहेत.
यातील अनेक किल्ले आहेत जे पर्यटकांसाठी खास आकर्षणाचे ठिकाणं बनले आहेत.
ठाणे-रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आपल्याला डोंगराळभागात अनेक किल्ले पाहायला मिळतात.
माथेरान-मलंग गडाच्या डोंगर रागांमध्ये ठाणे-रायगड जिल्ह्याच्या वेशीवरील चंदेरी किल्ला हा पर्यटकप्रेमींची आवडती जागा आहे.
अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वरच्या पलीकडे असलेल्या चिंचोलीच्या पायथ्याच्या गावापासून चंदेरीला जाता येते.
येथे गडावर पोहोचण्यासाठी अडीच तासांचे अंतर कापावे लागते.
या गडाची चढाई उंच आणि निसरडा आहे. या कातळावरुन पुढे जाताना पर्यटकांना भीती वाटते.
चंदेरी किल्ला हा २३०० फुट उंचीचा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.
माथेरान डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. गुहेत पाण्याची टाकी आहे.