Chandra Mohan Passed Away
Chandra Mohan Passed AwaySaam Tv

Chandra Mohan Dies: प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

Chandra Mohan Death: दिग्गज अभिनेते चंद्रमोहन यांची हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राणज्योत मालवली आहे.
Published on

Chandra Mohan Passed Away

तेलुगू सिनेसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. दिग्गज अभिनेते चंद्रमोहन यांची वयाच्या ८२ व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हृदयविकारासंबंधित आजारामुळे चंद्रमोहन यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chandra Mohan Passed Away
Bigg Boss 17: 'बिग बॉस 17'च्या घरामध्ये दिवाळी धमाका, ऐश्वर्या शर्मा आणि मन्नारा चोप्रावर भडकला सलमान खान

त्यांच्या परिवाराने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमोहन यांना हृदयविकारासंबंधित आजारामुळे हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांना सकाळी ९: ४५च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले. चंद्रमोहन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून टॉलिवूड सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे.

सध्या सोशल मीडियावर त्यांचे फॅन्स आणि अनेक सेलिब्रिटी मित्र त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. चंद्रमोहन यांच्या पश्चात पत्नी जालंधरा आणि दोन मुली असा परिवार आहे. अभिनेत्यावर सोमवारी हैदराबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

Chandra Mohan Passed Away
Kiran Mane Film: अतरंगी सातारकर करणार एकत्र स्क्रीन शेअर, किरण मानेसोबत दिसणार हास्यजत्रेतला ‘हा’ कलाकार

तेलुगू सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते चंद्रमोहन यांना ‘RRR’ फेम ज्युनियर एनटीआरने (Jr NTR ) ट्विट करत चंद्र मोहन यांना श्रद्धांजली वाहिली. “गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून ओळख निर्माण करणारे चंद्रमोहन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो...” असे ट्विट ज्युनियर एनटीआरने केले आहे.

चंद्र मोहन यांचा जन्म २३ मे १९४१ रोजी झाला होता. १९६६ मध्ये 'रंगुला रत्नम' या चित्रपटातून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. 'पदहारेला वायासु', 'चंदामामा रावे', 'अथानोक्कडे', '7 जी बृंदावन कॉलोनी', 'मिस्टर' सारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांनी जवळपास आपल्या सिने कारकिर्दीत एकूण ९३५ चित्रपटांमध्ये काम केले.

Chandra Mohan Passed Away
Prajakta Mali In KBC 15: ‘प्राजक्ता तू सगळं कसं मॅनेज करतेस?’, चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचे उत्तर, बिग बींनीही केलं प्राजुचं कौतुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com