Tiger 3 Collection: रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'टायगर ३' बॉक्स ऑफिसवर करणार धमाका, इतक्या कोटींची कमाई करण्याची शक्यता

Tiger 3 Box Office Collection Day 1: या चित्रपटाचे आतापर्यंत झालेल्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरून हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
Tiger 3
Tiger 3 Saam Tv

Tiger 3 Box Office Collection:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) स्टारर 'टायगर 3' हा चित्रपट (Tiger 3 Movie) रिलीज होण्यास फक्त एक दिवस बाकी आहे. अ‍ॅक्शनने भरलेल्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. 'टायगर 3'ने रिलीज होण्यापूर्वीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत झालेल्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरून हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सलमान खानच्या 'टायगर 3'ची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 15 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी बंपर कमाई करेल अशी अपेक्षा आहे. नुकताच ट्रेड अ‍ॅनालिस्ट सुमित कडेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्वीटरवर पोस्ट करत 'टागयर 3' च्या पहिल्या दिवशीच्या कमाईबद्दल माहिती देत अंदाज वर्तवाला आहे.

सुमित कडेल यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, ‘टायगर 3’ पहिल्याच दिवशी ४० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक कलेक्शन करू शकतो. दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कमाईचा हा आकडा खूप मोठा आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी तिकीट काउंटरवर मोठी गर्दी अपेक्षित आहे.

'टायगर 3'ला बंपर अ‍ॅडव्हान्स बुकिंग मिळत असून पहिल्या दिवशी 40 कोटींहून अधिक कलेक्शन होण्याची शक्यता आहे. असे असले तरी देखील हा चित्रपट शाहरुख खानच्या 'जवान'च्या ओपनिंग डे कमाईचा विक्रम मोडू शकणार नाही. बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, 'जवान' या वर्षी 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 75 कोटींची कमाई केली होती. अशामध्ये 'टायगर 3' च्या ओपनिंग डे कलेक्शनचा अंदाज सांगत आहे की हा चित्रपट पहिल्याच दिवशी शाहरुख खानच्या 'जवान'ला मागे सोडू शकणार नाही.

सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी पुन्हा एकदा 'टायगर 3'मधून पडद्यावर कमबॅक करत आहे. सलमानला पुन्हा एजंट टायगरच्या भूमिकेत आणि कतरिनाला झोयाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाचे सरप्राईज पॅकेट म्हणजे इमरान हाश्मी जो 'टायगर 3' मध्ये विलनची भूमिका साकारत आहे. 'टायगर 3'मध्ये शाहरुख खान 'पठाण'च्या भूमिकेत आणि हृतिक रोशन 'वार'मधील कबीरच्या भूमिकेत खास कॅमिओ करताना दिसणार आहे. ‘टायगर ३’ दिवाळीच्या मुहूर्तावर १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Tiger 3
Dunki New Poster: 'किंग खान'ने चाहत्यांना 'डंकी' स्टाइलमध्ये दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा, चित्रपटाचे नवीन पोस्टर आऊट

'टायगर 3' हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा ५ वा चित्रपट आहे. यशराज फिल्म्सने प्रेक्षकांच्या बजेटचा देखील विचार केला आहे. हा चित्रपट प्रेक्षक प्रत्येक फॉर्मटमध्ये पाहू शकणार आहेत. हा चित्रपट फक्त हिंदी नाही तर तमिळ आणि तेलुगू भाषेत देखील रिलीज होणार आहे. १२ नोव्हेंबरला या चित्रपटाचे स्क्रिनिंग सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरून हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी करण्याची शक्यता आहे.

Tiger 3
Kiran Mane Film: अतरंगी सातारकर करणार एकत्र स्क्रीन शेअर, किरण मानेसोबत दिसणार हास्यजत्रेतला ‘हा’ कलाकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com