Self Reflection : जाता-येता आरशात स्वत:ला बघणारी व्यक्ती नक्की काय विचार करते? काय आहे त्यामागील मानसशास्त्र

Self Focused Attention : आरशासमोरून जाता-येता चारवेळा स्वतःकडे पाहणारी व्यक्ता नक्की याबद्दल विचार करत असते. याबद्दल तुम्हाला महित आहे का? जाणून घ्या यामागील मानसशास्त्र
The Psychology Behind Self-Focused Attention and Mirror Gazing
The Psychology Behind Self-Focused Attention and Mirror Gazing saam tv
Published On: 

रस्त्याने चालताना एखाद्या दुकानाच्या काचेवर, गाडीच्या आरशात किंवा इतर कोणत्याही प्रतिबिंबित होणाऱ्या पृष्ठभागावर स्वतःची प्रतिमा दिसली की अनेकजण नकळत थांबून स्वतःकडे पाहतात. केस व्यवस्थित आहेत का, कपडे नीट दिसत आहेत का किंवा चेहऱ्यावर काही बदल झाला आहे का, हे तपासतात. अनेकांना ही केवळ एक सामान्य सवय वाटते. मात्र मानसशास्त्रानुसार, या सवयीमागे स्वतःच्या दिसण्याबाबतची जागरूकता आणि इतर लोक आपल्याकडे कसे पाहतात,याची चिंता असू शकते.

स्वतःकडे वारंवार पाहण्यामागे काय आहे कारण?

मानसशास्त्रात या प्रक्रियेला 'सेल्फ-फोकस्ड अटेंशन' म्हणजेच स्वतःकडे केंद्रित झालेले लक्ष असे म्हटले जाते. यामध्ये व्यक्तीचे लक्ष स्वतःचे दिसणे, विचार, भावना आणि वागण्याकडे अधिक केंद्रित होते. विशेषतः शारीरिक दिसण्याबाबत जागरूकता वाढल्यास व्यक्ती स्वतःच्या चेहऱ्याचे किंवा शरीराचे अधिक बारकाईने निरीक्षण करू लागते.

The Psychology Behind Self-Focused Attention and Mirror Gazing
Kitchen Vastu Tips: किचनच्या ओट्यावर चुकूनही ठेवू नका 'या' ७ वस्तू; नाहीतर, घरात होऊ शकते पैश्याची तंगी

इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, याची चिंता?

काही लोकांना सार्वजनिक ठिकाणी आपले व्यक्तिमत्त्व कसे दिसते, याची अधिक काळजी असते. आपण व्यवस्थित दिसतोय का, इतर लोक आपल्याकडे कसे पाहत असतील किंवा आपल्यामुळे कोणता प्रभाव पडत असेल, याचा विचार त्यांच्या मनात येऊ शकतो. मानसशास्त्रात याला 'पब्लिक सेल्फ-अवेअरनेस' असे म्हटले जाते. अशा व्यक्ती इतरांसमोर चांगली छाप पाडण्याबाबत अधिक जागरूक असू शकतात.

आरशात वारंवार पाहिल्याने आत्मविश्वास कमी होतो का?

2024 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात 63 सिंगापूरमधील विद्यापीठीन विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यांना आरशात स्वतःकडे पाहताना वेगवेगळ्या प्रकारे लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले. ज्या सहभागींचे लक्ष स्वतःच्या दिसण्यावर अधिक केंद्रित होते, त्यांच्यामध्ये स्वतःच्या चेहऱ्याबद्दल आणि एकूण दिसण्याबद्दलचे समाधान कमी झाल्याचे आढळले. विशेषतः आधीपासूनच स्वतःच्या शरीरयष्टीबाबत असमाधानी असलेल्या व्यक्तींमध्ये हा परिणाम अधिक दिसून आला. 2019 मधील आणखी एका अभ्यासातही आरशात स्वतःच्या आवडत नसलेल्या शारीरिक वैशिष्ट्यांकडे सतत लक्ष दिल्यास स्वतःच्या दिसण्याबाबत असमाधान वाढू शकते, असे निरीक्षण नोंदवण्यात आले.

The Psychology Behind Self-Focused Attention and Mirror Gazing
Health Care : थंडी वाढताच गुडघे आणि सांधे का दुखतात? केवळ स्वेटर-मफलर पुरेसे नाहीत, आरामासाठी हे उपाय करा

ही सवय नेहमीच चुकीची असते का?

अजिबात नाही. रस्त्यातून जाताना एखाद्या काचेतील प्रतिबिंब पाहणे किंवा केस आणि कपडे व्यवस्थित आहेत का, हे तपासणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र काही व्यक्ती वारंवार स्वतःचे निरीक्षण करतात, चेहऱ्यातील लहानसहान त्रुटी शोधतात किंवा स्वतःचे दिसणे आवडत नसल्यामुळे अस्वस्थ होतात. अशा वेळी या सवयीचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरशात स्वतःला पाहणे चुकीचे नाही. मात्र स्वतःच्या दिसण्याबाबत सतत चिंता करणे आणि त्यासाठी वारंवार स्वतःचे निरीक्षण करणे टाळणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.