Gaurav More Quit MHJ Rumor Instagram
मनोरंजन बातम्या

Gaurav More: गौरव मोरेने खरंच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो सोडला?, अभिनेत्याने स्वत:च सांगितलं चर्चेमागचं कारण...

Gaurav More Interview: कायमच आपल्या अभिनयामुळे आणि खास विनोदीशैलीमुळे चर्चेत राहणारा गौरव मोरेने हास्यजत्रा सोडल्याची सोशल मीडियावर चर्चा होत होती. आता खुद्द त्यानेच त्यामागील खरं कारण सांगितलं आहे.

Chetan Bodke

Gaurav More Quit MHJ Rumor

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने अनेक कलाकारांना प्रसिद्धी झोतात राहण्याची संधी दिली आहे. गौरव मोरे, शिवाली परब, रोहित माने, प्रियदर्शनी इंदलकर सह अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि खास विनोदीशैलीमुळे चर्चेत राहणारा गौरव मोरेने हास्यजत्रा सोडल्याची सोशल मीडियावर चर्चा होत होती. आता खुद्द त्यानेच त्यामागील खरं कारण सांगितलं आहे. नुकतंच अभिनेत्याने 'मुंबई टाईम्स'ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने त्याने सर्व स्पष्ट केले आहे. (Marathi Actors)

गौरव मोरे म्हणाला, " मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडलेली नाही. मला बरं वाटत नसल्यामुळे मी सुट्टीवर आहे. माझ्या खांद्याला दुखापत झाली असून मला डॉक्टरांनी काही दिवसांसाठी आराम करायला सांगितला आहे. म्हणून मी सध्या सुट्टीवर आहे. जेव्हा स्कीट सादर करतो, त्यावेळी बरीच ओढाताण होते. स्कीटमध्ये बरीच हालचाल असते; सतत हालचाल केल्यामुळे खांदा अधिक दुखावू शकतो. मला डॉक्टरांनी खांद्यावर जास्त ताण देण्यास सांगितलेलं नाही. म्हणून मला डॉक्टरांनी थोड्या दिवसांसाठी आराम करायला सांगितलं आहे. मी मार्च महिन्यामध्ये पुन्हा हास्यजत्रेत सहभागी होईल." (Health News)

गौरव मोरेला हास्यजत्रेतून फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्याला हास्यजत्रेतून 'फिल्टर पाड्याचा बच्चन' म्हणून ओळख मिळाली आहे. गौरव हास्यजत्रेव्यतिरिक्त इतर प्रोजेक्ट्स मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गौरव मोरे गेल्यावर्षी 'अंकुश', 'बॉइज ४', 'सलमान सोसायटी', 'लंडन मिसळ' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर लवकरच प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेल्या 'महापरिनिर्वाण' चित्रपटातही गौरव मोरे दिसणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

SCROLL FOR NEXT