Sanam Teri Kasam Re-Release Box Office Collection Google
मनोरंजन बातम्या

Sanam Teri Kasam: 'सनम तेरी कसम'ची चाहत्यांमध्ये क्रेझ, रि-रिलीज शो हाऊसफुल; निर्मात्यांनी केली चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा

Sanam Teri Kasam Re-Release Box Office Collection: 'सनत तेरी कसम' बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे.

Shruti Kadam

Sanam Teri Kasam: हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन यांचा रोमँटिक चित्रपट 'सनम तेरी कसम' बॉक्स ऑफिसवर रिरिलीज झाल्यापासून भरपूर कमाई करत आहे. हा चित्रपट सात वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तसेच जुनैद खानच्या 'लवयापा' आणि हिमेश रेशमियाच्या 'बॅडअस रवी कुमार' ही प्रदर्शित झळा आहे. परंतु सनम 'तेरी कसम हा चित्रपट या नवीन प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपेक्षा जास्त कमाई करत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचा सिक्वेल बनवण्याबाबत बोलले आहे.

चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन किती होता?

२०१६ मध्ये 'सनम तेरी कसम' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तेव्हा तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. सॅकनिल्कच्या मते, चित्रपटाने त्यावेळी ९.१ कोटींची कमाई केली होती. तथापि, जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला तेव्हा त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यामुळे, निर्मात्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित केला. यावेळी, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत १८.५७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'सनम तेरी कसम २' ची पटकथा तयार आहे.

इंडिया फोरमला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाच्या दिग्दर्शिका राधिका राव यांनी सांगितले की, 'सनम तेरी कसम २' ची पटकथा तयार आहे. राधिका राव म्हणाली, 'खरं तर, जेव्हा आम्ही भाग १ ची कथा लिहित होतो, तेव्हा आम्ही भाग २ ची कथा आधीच लिहिली होती, म्हणून जेव्हा इंदर झाडाजवळ जातो आणि सुरूचा आवाज ऐकतो तेव्हा आम्ही भाग १ ची कथा त्या दृश्यावर संपवली.'

'सनम तेरी कसम २' कधी प्रदर्शित होईल?

राधिका पुढे म्हणाली, 'लोकांच्या प्रतिक्रिया पाहून असे वाटते की भाग २ लवकरच आणावा लागेल. या व्हॅलेंटाईन डेला लोकांनी भाग-१ पाहिला आहे. आता ते पुढच्या व्हॅलेंटाईनला भाग २ पाहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT