Mamta Kulkarni: माझ्याकडून पैसे मागितले...; ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा, महामंडलेश्वर पदासाठी लाखभर रुपयांची मागणी

Mamta Kulkarni mahamandaleshwar controversy: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने १० फेब्रुवारी रोजी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला देत इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत एक मोठा खुलासा केला आहे.
Mamta Kulkarni
Mamta KulkarniSaam Tv
Published On

Mamta Kulkarni: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून राजीनामा देण्याची घोषणा केली. तिला हे पद देण्याबाबत किन्नर आखाड्यात बराच विरोध झाला होता, त्यानंतर ममताने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ममताने सांगितले की ती तिचे आयुष्य साध्वीसारखे जगेल. पण या व्हिडिओमध्ये तिने महामंडलेश्वर पदासाठी पैसे मागण्याबद्दलही खुलासा केला आहे.

ममता कुलकर्णी पैशांच्या व्यवहाराबद्दल म्हणाल्या की, “माझ्याकडे २ लाख रुपये मागितले गेले तेव्हा माझ्यासमोर तीन-चार महामंडलेश्वर होते. माझ्या समोर, त्याच खोलीत तीन-चार जगत गुरुही होते. ममता कुलकर्णी म्हणते की तिने पैसे नसल्याचे सांगून नकार दिला होता.

Mamta Kulkarni
Laughter Chefs 2: अंकिता लोखंडेने लाफ्टर शेफ शोमध्ये मारली विकी जैनच्या कानाखाली; म्हणाली, 'या म्हाताऱ्याचे प्रेम माझ्यावर...'

पदासाठी ममता कडून २ लाखांची मागणी?

ममता कुलकर्णीने नुकताच ५ मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यावेळी ती या पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हणत असल्याचे दिसून आले. ती २५ वर्षे साध्वी होती आणि भविष्यातही साध्वी राहील असे ती म्हणाली. महामंडलेश्वर ही पदवी मिळाल्यावर तिने सांगितले, “मला आचार्य डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्याबद्दल खूप आदर आहे. जेव्हा माझ्याकडे २ लाख रुपये मागितले गेले तेव्हा माझ्यासमोर तीन ते चार महामंडलेश्वर होते.”

Mamta Kulkarni
Laughter Chefs 2: अंकिता लोखंडेने लाफ्टर शेफ शोमध्ये मारली विकी जैनच्या कानाखाली; म्हणाली, 'या म्हाताऱ्याचे प्रेम माझ्यावर...'

महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिल्यानंतर तिने सांगितले की जेव्हा तिच्याकडे २ लाख रुपये मागितले गेले तेव्हा सांगितले की माझ्याकडे पैसे नाहीत, त्यावेळी तिच्यासमोर तीन-चार जगत गुरु देखील उपस्थित होते. मग महामंडलेश्वर जय अंबा गिरी यांनी त्यांच्या खिशातून दोन लाख रुपये काढले आणि लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना दिले. पुढे ममता म्हणते की माझ्यावर प्रश्न उपस्थित केले जातात की मी ४ कोटी रुपये दिले, ३ कोटी रुपये दिले. पण हे पैशाने साध्य होत नाही, हे तीव्र तपस्या आणि ध्यानाने साध्य होते.

महामंडलेश्वर होण्यापूर्वी एक परीक्षा होती

ममता कुलकर्णी यांनी आधीच सांगितले आहे की तिची महामंडलेश्वर पद देण्यापूर्वी एक कठीण परीक्षा घेण्यात आली होती. ४ जगतगुरूंनी तिची परीक्षा घेतली होती. तिला कठीण प्रश्न विचारले गेले. तिने सांगितले की, त्या प्रश्नांच्या उत्तरावरून तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना समजले की तिने खूप तपश्चर्या केली आहे. माहितीनुसार ममता कुलकर्णीने १९९६ पासून भक्तीचा मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com