Laughter Chefs 2: अंकिता लोखंडेने लाफ्टर शेफ शोमध्ये मारली विकी जैनच्या कानाखाली; म्हणाली, 'या म्हाताऱ्याचे प्रेम माझ्यावर...'

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात पुन्हा एकदा 'लाफ्टर शेफ' या शोमध्ये भांडण झाले. यावेळी अभिनेत्रीने विकी जैनच्या कानाखाली देखील मारली.
Ankita Lokhande and Vicky Jain Laughter Chefs 2
Ankita Lokhande and Vicky Jain Laughter Chefs 2Google
Published On

Laughter Chefs 2: हिंदी टेलिव्हिजनविसरली प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन हे लाफ्टर शेफ शोच्या सीझन २ मध्ये दिसणार आहेत. प्रेक्षकांना पहिल्या भागात ही जोडी खूप आवडते कारण त्यांच्यातील केमेस्ट्री फारच मनोरंजक आहे. या दोघांमध्ये सतत होणारी तू तू- मैं मैं प्रेक्षकांना पाहायला फार आवडते. असाच एक किस्सा शो दरम्यान घडला, विकीने सांगितले की त्याला वाटते त्याच्यावर प्रेम जबरदस्तीने लादले गेले आहे, त्यानंतर अभिनेत्रीने त्याला कानाखालीच मारली.

भांडण हा प्रेमाचा एक भाग

खरंतर, जेव्हा शोची होस्ट भारती सिंगने विकीला विचारले की त्याच्यासाठी प्रेम म्हणजे काय, तेव्हा अंकिताने त्याच्या जागी म्हटले की, प्रेम ही खूप सुंदर गोष्ट आहे. त्यातही भांडण आहे. त्यावर कृष्णा तिला थांबवतो आणि म्हणतो की तू चुकीचं बोलतेस प्रेमात मारामारी देखील होते. हे ऐकून विकी खूप हसतो, पण अंकिता म्हणते की त्यांचे भांडण देखील प्रेमाचा एक भाग आहे.

Ankita Lokhande and Vicky Jain Laughter Chefs 2
Shivali Parab Sister: जीव गुंतला! शिवाली परबची सख्खी बहीण दिसते अभिनेत्रींपेक्षाही सुंदर

विकी म्हणाला प्रेम लादले जाते

मग विकी म्हणतो की बऱ्याचदा मला असं वाटतं की कदाचित हे प्रेम घडलंच नाही, ते लादलं गेलं होतं. त्यानंतर अंकिता सेटवरून निघून जाण्याचे नाटक करते आणि म्हणते की मी जाते इथून निघून. तू जा विकी, प्रेम तुझ्यावर लादले गेल आहे ना. यावर विकी म्हणतो तू काहीही बोल, बाळा. तू प्रेम लादलेस का? अंकिता पुन्हा हसते आणि म्हणते की या म्हाताऱ्याचे प्रेम माझ्यावर लादले गेले आहे.

Ankita Lokhande and Vicky Jain Laughter Chefs 2
India’s Got Latent: रणवीर अलाबादियासह अपूर्वा मखीजाही वादाच्या भोवऱ्यात; चाहते संतप्त, अडचणीत वाढ!

अंकिता विकीला कानाखाली मारते.

त्यानंतर कृष्णा अंकिताला एक बूट आणून देतो आणि म्हणतो की विकीच्या जेवण्याची वेळ झाली मार फेकून. अंकिता मग विकीवर बूट फेकून मारते आणि म्हणते की घे. मग ती गंमतीने विकीच्या कानाखाली मारते.

अंकिता आणि विकी जेव्हा बिग बॉस शोमध्ये आले तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते कारण दोघांमध्ये खूप भांडणे झाली होती. त्यांनतर दोघांच्याही नात्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com