Sunil Grover Struggle Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunil Grover Birthday : ‘गुत्थी’ ते ‘डॉक्टर गुलाटी’ बनून प्रेक्षकांना हसवणारा सुनील ग्रोव्हर, वाचा अभिनेत्याच्या संघर्षमयी प्रवासबद्दल...

Sunil Grover Struggle Story : आपल्या विनोदाने चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हरचा आज वाढदिवस आहे. सुनीलचा जन्म ३ ऑगस्ट १९७७ रोजी हरियाणातील एका छोट्याशा गावात झाला.

Chetan Bodke

आपल्या विनोदाने चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हरचा आज वाढदिवस आहे. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या सुनीलचा जन्म ३ ऑगस्ट १९७७ रोजी हरियाणातील एका छोट्याशा गावात झाला. सुनील आज आपला ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. सुनीलने सर्वाधिक ‘गुत्थी’ आणि ‘डॉक्टर गुलाटी’ बनून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. एका मुलाखतीत अभिनेत्याने ‘गुत्थी’ बनल्यानंतरच त्याचे आयुष्य बदलल्याचे सांगितले.

सुनील ग्रोव्हरला एकेकाळी दिवसभर काम करून त्याला महिन्याला ५०० रुपये मिळायचे. त्याने आपल्या स्ट्रगलच्या काळात कठोर परिश्रम घेतले. त्याने केव्हाच हार मानली नाही. आपल्या संघर्षाबद्दल सुनील ग्रोव्हर म्हणालेला, "थिएटरमध्ये मास्टर पूर्ण केल्यानंतर मी मुंबईमध्ये आलो. मुंबईत आल्यानंतर मी वर्षभर माझी सेव्हिंग्ज खर्च करत राहिलो. माझ्या स्ट्रगलच्या काळात मी एका पॉश भागात राहायचो. तर माझी सर्व सेव्हिंग संपली. मी त्यावेळी महिन्याला फक्त ५०० रुपयेच कमवायचो. जरीही कमी पैसे कमवत असलो तरीही मी लवकरच यशस्वी होईल, असा मला विश्वास होता. "

"मला माहित आहे, मी अभिनय शकतो. शाळेच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या प्रमुख आतिथीने मला सांगितलेले तू नाटकात भाग घेऊ नकोस, कारण अन्य लोकांवर अन्याय होईल. आपल्यासारखे मुंबईत असे अनेक लोकं आहेत, जे आपलं स्वप्न उराशी घेऊन या मायानगरीत आले आहे. त्यांच्याप्रमाणे आपल्यालाही संघर्ष करायचाच आहे. वडिलांप्रमाणेच आपलेही स्वप्न अपूर्ण राहणार, असं मला त्यावेळी वाटत होतं. वडिलांना रेडिओ उद्घोषक व्हायचं होतं. पण आजोबांच्या विरोधामुळे त्यांना बँकेत काम करावे लागले. वडिलांप्रमाणे स्वप्न पूर्ण न होण्याचे दु:ख मीही अनेकदा जवळून पहिले होते."

"मी मुंबईत मिळेल ते काम करायचो. त्यानंतर मला एका टीव्ही शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. काही दिवस मी काम केले त्यानंतर मला कामावर बोलवणे बंद केले. त्यानंतर मला या शोमधून रिप्लेस केल्याचं कळलं." सुनीलला सर्वाधिक प्रसिद्धी एका रेडिओ शोमधून मिळाली त्यानंतर त्याला चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम मिळायला लागले. सुनीलने आपल्या कॉमेडीमुळे विशेष प्रसिद्धी मिळवली. 'प्रोफेसर मनी प्लँट', 'गुटर गू', 'कॉमेडी सर्कस', 'द कपिल शर्मा शो' सारख्या अनेक शोमध्ये त्याने कॉमेडी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

SCROLL FOR NEXT