LIC Dhan Varsha Policy : एलआयसीने तुमच्या पैशाच्या संरक्षणासाठी एक खास योजना आणली आहे. ज्याचे नाव एलआयसी धनवर्षा योजना (Scheme) आहे.
आजच्या काळात प्रत्येकाला आपल्या भविष्यासाठी बचतीबरोबरच आर्थिक सुरक्षितताही हवी असते. अशा परिस्थितीत भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी लोकांच्या गरजेनुसार विमा पॉलिसी आणत असते. एलआयसीने तुमच्या पैशांच्या (Money) संरक्षणासाठी एक खास योजना आणली आहे. ज्याचे नाव एलआयसी धनवर्षा योजना आहे. या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागेल.
या योजनेत एकदा प्रिमियम जमा करून १० पट रिटर्न्स मिळू शकतात. धन वर्षा योजना ही एक नॉन-पार्टिसिपेटिंग, पर्सनल, सिंगल प्रिमियम आणि सेव्हिंग्ज इन्शुरन्स स्कीम आहे.
धनवर्ष योजनेत तुम्हाला दोन प्रकारचे पर्याय मिळतात. पहिल्या पर्यायात जमा केलेल्या प्रीमियमवर तुम्हाला १.२५ पटांपर्यंत रिटर्न मिळेल. जर तुम्ही १० लाख रुपयांचा एकच प्रीमियम भरला आणि पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर तुम्हाला १२.५ लाख रुपयांच्या गॅरंटीड बोनसचा लाभही मिळेल. दुसऱ्या पर्यायात तुम्हाला १० वेळा रिटर्न मिळू शकतात. यात तुम्ही १० रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला १ कोटी रुपयांपर्यंत रिटर्न मिळू शकतो.
एलआयसीची धन वर्षा पॉलिसी तुम्ही १० किंवा १५ वर्षांसाठी खरेदी करू शकता. अशा परिस्थितीत १० वर्षांची पॉलिसी खरेदी करण्याचे किमान वय ३ वर्षे आणि १५ वर्षे खरेदी करण्यासाठी किमान ८ वर्षांचे असणे आवश्यक असते.
धनवर्षा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून १.२५ पट परतावा मिळविण्याचे कमाल वय ६० वर्षे असून १० पटीने परतावा मिळण्याचे कमाल वय ४० वर्षे आहे. या पॉलिसीवर तुम्ही कमी व्याजदरात कर्ज सुविधेचा लाभही घेऊ शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.