केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणला आहे.
भूस्खलनाची घटना २९ जुलैच्या मध्यरात्री वायनाडच्या अट्टामाला, मुंडक्काई, चुरलमाला आणि नूलपुझा या गावात घडली.
या घटनेत आतापर्यंत ३०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही त्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून अद्याप अजूनही काही गावकरी बेपत्ता आहेत.
भारतीय हवाई दलासह NDRF, SDRF, भारतीय लष्कर आणि पोलिसांची अनेक पथक मदत आणि बचावकार्य करीत आहेत.
केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या दुर्घटनेत काही टॉलिवूड सेलिब्रिटींनीही 'एक हात मदतीचा' पुढे केला आहे.
'जय भीम' फेम अभिनेता सूर्या आणि त्याची पत्नी ज्योतिकाने ५० लाख रुपये मदत निधी म्हणून दिली आहे.
या यादीत, टॉलिवूड अभिनेता कार्थीनेही ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
तर, 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदान्नानेही १० लाख रुपयांची मदत केली आहे.
अभिनेता चियान विक्रमनेही २० लाख रुपयांची मदत केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.