"कसेही खेळले, मुर्खपणा केला, तरी..."; Bigg Boss Marathi 5 मधील ‘या’ तीन स्पर्धकांसाठी किरण मानेंची खास पोस्ट

Kiran Mane On Bigg Boss Marathi 5 Contestants : ग्रामीण भागातल्या रीलस्टारचे कौतुक करणारी आणि स्वत:चा बिग बॉसमधील अनुभव सांगणारी पोस्ट अभिनेता किरण माने यांनी शेअर केली आहे.
Kiran Mane On Bigg Boss Marathi 5 Contestants
Bigg Boss Marathi 5 ContestantsInstagram/ @kiranmaneofficial
Published On

मराठी ‘बिग बॉसचं पाचवं पर्व’ पहिल्या आठवड्यापासूनच चर्चेत आलं आहे. एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अशा सर्व गोष्टी यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहे. यंदाच्या सीझनमध्ये मराठी सेलिब्रिटींसोबतच सोशल मिडिया एन्फ्लूएंसरनेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे.

Kiran Mane On Bigg Boss Marathi 5 Contestants
Wayanad Landslide : वायनाड भूस्खलनानंतर टॉलिवूड स्टारकडून ‘एक हात मदतीचा’, कोणत्या कलाकारांनी किती दिली रक्कम ?

धनंजय पोवार, घन:श्याम दरोडे आणि सूरज चव्हाण या ग्रामीण भागातल्या रीलस्टारलाही संधी मिळाली आहे. या ग्रामीण भागातल्या रीलस्टारचे कौतुक करणारी आणि स्वत:चा बिग बॉसमधील अनुभव सांगणारी पोस्ट अभिनेते किरण माने यांनी शेअर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ग्रामीण भागातल्या रीलस्टारचे कौतुक केले आहे. शिवाय स्पर्धकांना पाठिंबाही दिला आहे.

Kiran Mane On Bigg Boss Marathi 5 Contestants
Khel Khel Mein चा ट्रेलर रिलीज, गेममधून होणार मित्र- मैत्रिणींची पोलखोल

शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिलंय की, "हे कसेही खेळले, समजा मुर्खपणा केला, तरी माझं प्रेम आणि सपोर्ट या तिघांना राहणार. तिघंही गावच्या मातीतले आहेत आणि दुसरं म्हणजे शहरी 'सो कॉल्ड' सभ्य-असभ्यता, संस्कृती-फिंस्कृती, शुद्ध-अशुद्धता उंच कोलून, रिअल वागून लोकप्रिय होऊन इथवर पोहोचलेली आहेत. इथेही ते जे काहीही कसेही वागतील ते 'रिअल' असणार. या सगळ्यांविषयी मला आदर आहे आणि त्यांना माझ्याविषयी. तिघंबी लै भारीयेत. ते ज्या पद्धतीचे रील्स बनवतात, ते मला कधीच जमणार नाही."

"आपली इच्छा नाही आणि लायकीही नाही आणि ठामपणे सांगतो, मी जे अभिनयात, परिवर्तन चळवळीत आणि राजकारणात एकाचवेळी जे काही करतोय तोही त्यांच्या सोडाच, मनोरंजन इंडस्ट्रीत नव्या जुन्या कुणाच्याच तोंडचा घास नाही, दम नाही. फरक असतो. कुणाला गंमत जंमत करणारी रील्स करून फॉलोअर्स मिळतात, तर कुणाला विवेकी विचारसरणी मांडून आणि अभिनय करुन. खोटं वागणार्‍या आणि माकडचाळे करणार्‍यांचं बिगबॉसमध्ये माकड होतं. हे चार वर्षांपुर्वी माझं मत होतं. पुर्वी मी बिगबॉसच्या सिझन दोनची ऑफर नाकारली होती, हा त्याचा सणसणीत पुरावा! बाकी धुणीभांडी करण्याला मी कमीपणाचं मानत नाही."

Kiran Mane On Bigg Boss Marathi 5 Contestants
Samantha Ruth Prabhu News : "कठीण काळात हार न मानता मी...", समांथा प्रभुने शेअर केला कठीण काळातला संघर्ष

"'बायकांची कामे' मानून अशा कामांना हिणवणार बुळगे नामर्द असतात. असो सीझन चार स्वीकारला कारण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. मी मोदीवर टीका करणारी पोस्ट केली. भक्तडुक्कर पिलावळीनं उच्छाद मांडला. मला सीरीयलमधून काढून टाकलं गेलं. आज मी जिद्दीनं पायर्‍या चढत शत्रूंची थोबाडं ठेचत प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचं वलय कितीतरी पटींनी वाढवलं. यासाठी माझ्या चाहत्यांसमोर मी नम्रच आहे. याचबरोबर बिग बॉस माझ्यासाठी गॉडफादर ठरलं.इथं माकड केलं जात नाही. बिग बॉस वाघाला वाघ म्हणूनच दाखवतो आणि माकडाला माकड."

Kiran Mane On Bigg Boss Marathi 5 Contestants
Nikki Tamboli Funny Video : "सगळे हसतात हिच्यापायी, बोलते सारखी बाई बाई"; निक्की तांबोळीमुळे स्पर्धक वैतागले

"विशेषत: ग्रामीण भागातली जनता पहिल्यांदा बिगबॉसकडे वळली आणि मला अभूतपुर्व प्रेम दिलं.माझ्याहून निम्म्या वयाच्या पोरांना धोबीपछाड देत थेट टॉप थ्रीपर्यंत मजल मारू शकलो ते यामुळेच.गांवोगांवी मिरवणुका निघाल्या. 'बिगबॉस पब्लिक विनर किरण माने' अशा रांगोळ्या काढल्या गेल्या. बिगबॉसच्या घरातही मी रोज एक तुकाराम महाराजांचा अभंग अर्थासहित सांगणे. गौतम बुद्ध, छ. शिवराय, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक गोष्टी सांगणे, या जगावेगळ्या गोष्टी केल्या. हे बिग बॉसमध्ये कधीच घडलं नव्हतं आणि खात्रीनं सांगतो, यापुढंही हे घडणार नाही. असो. तर, डीपी, घन:श्याम आणि सूरज...माझ्या मातीतल्या माझ्या बहुजन भावांनो, तुम्ही तुमच्या श्टाईलनं धुमडी उडवा त्या घरात. चिखलात धुरळा पान्यात आग लावा.पुंग्या टाईट करा एकेकाच्या. तुम्हा तिघांनाबी लै लै लै प्रेम..."

Kiran Mane On Bigg Boss Marathi 5 Contestants
Asha Bhosle Song Banned: आशा भोसलेंच्या सदाबहार गाण्यावर सरकारने घातली होती बंदी, काय घडलं होतं ५३ वर्षांपूर्वी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com