Sanju Rathod Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT: 'बिग बॉस ओटीटी'मध्ये 'गुलाबी साडी' गाण्याची जादू; संजू राठोडच्या गाण्यावर टॉप ५ स्पर्धकांनी धरला ठेका

Sanju Rathod Perform At Bigg Boss OTT: 'बिग बॉस ओटीटी'चे तिसरे पर्व संपायला काही दिवस उरले आहे. या शोमध्ये आता एक लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. यामध्ये संजू राठोड परफॉर्मन्स करणार आहे.

Siddhi Hande

'बिग बॉस ओटीटी'ची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. बिग बॉस ओटीटीचा महाअंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे या पर्वात कोण जिंकणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. या शोमध्ये आता गुलाबी साडी फेम संजू राठोडची एन्ट्री होणार आहे. संजू राठोड बिग बॉस ओटीटी लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्मन्स करणार आहे. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बिग बॉस ओटीटीचे पर्व संपायला काही दिवस उरले आहेत. त्यामुळे स्पर्धकांसाठी खास लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. यात मराठमोळ्या संजू राठेडने मराठी गाण्यावर परफॉर्मन्स केला आहे. संजू राठोडने गुलाबी साडी, नऊवारी साडी ही गाणी गायली आहे. या गाण्यावर घरातील सर्व सदस्य नाचताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये संजू राठोड 'नऊवारी साडी' गाणे गाताना दिसत आहे. या गाण्यावर घरातील सर्व सदस्यांनी ठेका धरला आहे. त्यामुळे आता मराठी गाण्याचा डंका बिग बॉस ओटीटीमध्ये वाजत असल्याचे दिसत आहे. संजू राठोडच्या या गाण्याचे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात कौतुक होत आहे.

बिग बॉस ओटीटीच्या शेवटच्या एलिमिनेशमध्ये अरमान मलिक आणि लवकेश कटारिया घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे रणवीर शौरी, सना मकबुल, नेझी, कृतिका मलिक आणि साई केतन टॉप पाचमध्ये पोहचले आहे. यांच्यापैकी कोण 'बिग बॉस ओटीटी'ची ट्रॉफी घरी घेऊन जातं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : मराठमोळ्या अभिनेत्याची सलमान खानच्या 'बिग बॉस 19'मध्ये एन्ट्री? स्वत:च केला खुलासा

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाच्या आमदाराला राधाकृष्ण विखे पाटील यांची महायुतीत येण्याची खुली ऑफर

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का! खासदार विशाल पाटलांच्या कट्टर समर्थकांचा भाजपात प्रवेश

New Income Tax Bill: नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर, करदात्यांसाठी केले महत्त्वाचे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Success Story: 12वी फेल, २ वर्षे दूध विकले, मोठ्या जिद्दीने केली UPSC क्रॅक; नाशिकच्या लेकाची यशोगाथा

SCROLL FOR NEXT