Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस'च्या घरात पार पडणार पहिला नॉमिनेशन टास्क; निक्की की अंकिता, कोण घराबाहेर जाणार?

Bigg Boss Marathi 5 1st Nomination Task : बिग बॉस मराठी'च्या ५ व्या सीझनमधील पहिलं नॉमिनेशन कार्य आजच्या एपिसोडमध्ये पार पडणार आहे. शो सुरू होऊन चारच दिवस पूर्ण झाले असून तोच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.
Bigg Boss Marathi 5 Latest News
Bigg Boss Marathi 5 1st Nomination TaskSaam Tv
Published On

'बिग बॉस मराठी ५' ची सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसापासूनच चाहत्यांमध्ये या शोची क्रेझ पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस' म्हटलं की भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती, प्रेम आणि मैत्री आलीच. त्याशिवाय 'बिग बॉस'च्या घरात टास्कच्या माध्यमातूनच स्पर्धकांची पुढची खेळी ठरते. 'बिग बॉस मराठी'च्या ५ व्या सीझनमधील पहिलं नॉमिनेशन कार्य आजच्या एपिसोडमध्ये पार पडणार आहे. 'बिग बॉस मराठी' सुरू होऊन चारच दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशी घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.

Bigg Boss Marathi 5 Latest News
Priyanka Chopra News : अभिमानास्पद ! परदेशात 'देसी गर्ल'चा सन्मान; ऑस्ट्रेलियातील 'या' प्राण्याला प्रियंका चोप्राचं नाव

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये आज नॉमिनेशन कार्याचा शुभारंभ होणार आहे. याबाबतचा प्रोमोदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 'नॉमिनेशनची तोफ' असं या पहिल्या नॉमिनेशन कार्याचं नाव असणार आहे. प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी 'बिग बॉस'ने 'नॉमिनेशन तोफ' हे कार्य अवलंबलं आहे. पहिल्याच कार्यादरम्यान 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आणि बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे.

टास्कसाठी भिडताना अंकिता आणि निक्कीमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाचीदेखील झालेली पाहायला मिळेल. राड्यादरम्यान या दोन सदस्य टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्येच पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. एक घर, 100 दिवस आणि 16 स्पर्धकांचा प्रवास आता सुरू झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळत आहे.

Bigg Boss Marathi 5 Latest News
Kiara Advani Birthday: कियाराने कोणाच्या सांगण्यावरून बदललं नाव? काय आहे अभिनेत्रीचं खरं नाव? जाणून घ्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com