Taapsee Pannu Birthday: सॉफ्टवेअर इंजिनिअर, कॉलेजमध्ये मॉडेलिंग ते बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री; तापसी पन्नू आज आहे कोट्यवधींची मालकीण

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू आज तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्त तिचा फिल्मी करिअरचा प्रवास जाणून घेऊया.
Bollywood Actress
Taapsee Pannu Birthday:Saam Tv
Published On

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू आज तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. तापसी पन्नूचा जन्म १ऑगस्ट १९८७ रोजी दिल्ली येथे झाला. शीख कुटुंबात जन्मलेल्या तापसीचे वडील दिल मोहन हे व्यवसायक आहेत. तर आई निर्मलजीत पन्नू गृहिणी आहे. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या तापसीला १२ वीमध्ये ९० % गुण मिळाले होते. यानंतर तापसीने गुरू तेग बहादूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना तापसीला मॉडेलिंगची आवड निर्माण झाली.

Bollywood Actress
HBD Mrunal Thakur: हिंदी मालिका ते साउथची सुप्रसिद्ध अभिनेत्री; एकेकाळी आयुष्य संपवायला निघालेली अभिनेत्री मृणाल ठाकूर आहे आज कोट्यवधींची मालकीण

मॉडेलिंगची आवड

तापसी पन्नूने २००८ मध्ये टॅलेंट हंट शोमध्ये भाग घेतला होता. यासाठी तिने ऑडिशन दिली. तापसीची निवड देखील झाली. तापसीने फेमिना मिस इंडिया स्पर्धेतही सहभाग घेतला होता. मॉडेलिंगची आवड असणाऱ्या तापसीने रिलायन्स ट्रेंड्स, कोको- कोला, पॅन्टालून्स या टॉप ब्रँडच्या जाहीराती केल्या आहेत. बॉलिवूडविश्वात पदार्पण करण्यापूर्वी तापसीने तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केले. २०१० मध्ये तापसीने 'झुम्मंडी नादम' या तेलुगू चित्रपटात काम केले. तापसीने तेलुगू, तामिळ, मल्याळम या चित्रपटामध्ये काम केले आहे.

'या' तेलुगू चित्रपटातून केलं पदार्पण

२०१३ मध्ये 'चश्मेबद्दूर' या कॉमेडी चित्रपटातून तापसी पन्नूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याचवर्षी तापसीने 'बेबी' चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनय केला. या चित्रपटातील गुप्तहेर शबाना ही तापसीची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. तापसीने पिंक, नाम शबाना, जुडवा 2, मुल्क, मनमर्जिया, बदला. थप्पड, हसीन, रश्मी यासांरख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला

आहे.

अलिशान गाड्यांची आवड

तापसी पन्नू एका चित्रपटासाठी सुमारे २ कोटी रूपये घेते. इतकच नाही तर तापसी अनेक जाहिरातीमधूनही पैसे कमावते. सोशल मिडिया ब्रॅन्डिंग तापसी करते. तापसीकडे बीएमडब्ल्यू , मर्सिडीज एसयूव्ही यासारख्या अलिशान कार आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com