govinda sunita ahuja divorce saam tv
मनोरंजन बातम्या

Govinda Divorce : गोविंदा-सुनीताचा घटस्फोट? गोविंदाचा 37 वर्षांचा संसार मोडणार?

Govinda : अभिनेता गोविंदाचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरू आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सोबत राहत नसल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय. मात्र, खरंच गोविंदाचा घटस्फोट झालाय का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Sandeep Chavan

Govinda Divorce News : गोविंदा...80 च्या दशकात ज्याने सिनेमे गाजवले. कोट्यवधी प्रेक्षकांना आपलंस केलं. तोच गोविंदा आता वैवाहिक जीवनात अडचणीत आलाय. गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजाचा आता घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, खरंच गोविंदा घटस्फोट घेणार आहे का? गोविंदा आणि सुनीताच्या संसाराला कुणाची नजर लागली? असं काय झालं की दोघांनी वेगळं होण्याचा टोकाचा निर्णय घेतलाय? असे अनेक प्रश्न व्हायरल होतायत. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

'बॉलिवूड अभिनेता गोविंदा घटस्फोट घेणार आहे.दोघेही सोबत राहत नाही. त्यामुळे गोविंदा आणि पत्नी सुनीताचा घटस्फोट होणार आहे'

हा मेसेज व्हायरल होत असल्याने खरंच यात तथ्य आहे का? कारण, गोविंदाचे करोडो फॅन्स आहेत. त्यामुळे याचं सत्य अनेकांना जाणून घ्यायचंय. आमच्या टीमने याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल मेसेज

- गोविंदा आणि सुनीताचं लग्न 1987 साली झालं

- सुनीता आणि गोविंदा सोबत राहत नसल्याची चर्चा

- गोविंदा-सुनीताच्या घटस्फोटाबाबत अधिकृत माहिती नाही

- घटस्फोटाबाबत गोविंदाच खरी माहिती देऊ शकतो

सध्या दोघेही एकत्र राहत नसल्याची माहिती मिळतेय. दोघांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुलं आहेत. मात्र, गोविंदाचा घटस्फोट होणार असल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT