Malvan News : मालवणात 'पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे, गद्दारांच्या घरावर चालवला बुलडोझर

Ind vs Pak : चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतानं पाकिस्तानचा दारूण पराभव केला. मात्र त्याचे पडसाद थेट कोकणात उमटले. या मॅचमुळे काहींचा देशद्रोही म्हणून पर्दाफाश झाला. कोकणातल्या या पाकड्यांना पोलिसांनी बुलडोझर स्टाईल धडा शिकवलाय. यांच्यासोबत नेमकं काय केलं? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Malvan News
Malvan NewsSaam Tv
Published On

Malvan : रविवारी झालेल्या रोमाचंक क्रिकेट सामन्यात भारतानं पारंपारिक शत्रु पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला. या विजयानंतर भारतातील गुप्तपणे दडून बसलेल्या पाकाड्यांची मळमळ ही मालवणमध्ये ऐकायला आली. पाकचा पराभव होताच या पाकाड्यांचा पुळका आलेल्या पाकप्रेमींनी चक्क पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा दिल्या.

ही धक्कादायक बातमी समजताच राज्यभरातून याविरोधात संताप व्यक्त झाला. आणि प्रशासनानं मालवणच्या वायरी आडवन येथील या भंगार व्यावसायिकाला जन्माची अद्दल घडवली. देशद्रोही घोषणा देणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर आता ज्या ठिकाणी पाकप्रेमाचा पुळका या देशद्रोह्यांना आला होता ते अनधिकृत भंगाराचं दुकान प्रशासनानं बुलडोझर फिरवत जमीनदोस्त केलंय. प्रशासनानं कशी कारवाई केली जाणून घेऊया थेट घटनास्थळावरून....

Malvan News
Mahashivratri 2025 : 'नमः पार्वती पतये हर हर महादेव'चा अर्थ तुम्हाला माहितीये का?

मालवणमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्या सुप्त पाकाड्यांवर आम्ही जिल्ह्यातून हाकलवून देणार असल्याचं स्थानिक आमदार निलेश राणेंनी म्हटलंय. तसंच पोलिस प्रशासनानं तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली. त्यानंतर पोलिसांनी त्या भंगार व्यवसायिकाची राहण्याची खोली, शेड, भंगार साहित्य आणि दोन गाड्या जेसीबीच्या साहाय्याने उध्वस्त करत धडक कारवाई केली.

Malvan News
Eknath Shinde : 'नीलम गोऱ्हेंनी काळे धंदे बाहेर काढल्याने उद्धव ठाकरेंना मिरच्या..' एकनाथ शिंदे यांच्याकडून खणखणीत प्रत्युत्तर

भारतात राहून पाकाड्यांचा पुळका आल्याची ही काही पहिलीच घटना नाही. या आधी देखिल अशा घटना समोर आल्या होत्या. परंतू आता प्रशासनानं या पाकड्यांच्या घरावर बुलडोझर फिरवून देशाच्या सन्मानासोबत कुठलीच तडजोड होणार नाही हा थेट इशारा दिलाय.

Malvan News
Pandharpur News : विठुरायाच्या मंदिराला चांदीचा दरवाजा, ३० किलो चांदीत कोरीव काम, भक्तांनी दिलं दान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com