Gauri Khan Conversion times Of India
मनोरंजन बातम्या

Gauri Khan Conversion: शाहरूख खानकडून गौरी खानचं धर्मपरिवर्तन ? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य?

Viral Photo Gauri Khan : अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने धर्मपरिवर्तन केलंय असा दावा करणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Sandeep Chavan

किंग खान शाहरूखच्या लग्नाला 33 वर्षे झाली. मात्र आता शाहरूखने पत्नीचं धर्मपरिवर्तन केलंय असा दावा करणारा मेसेज आणि फोटो व्हायरल होतायत. पण, हे खरं आहे का? याची आम्ही पडताळणी केली मग काय सत्य समोर आलं. पाहुयात. हे फोटो पाहून तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील..कधीही नकाबमध्ये न दिसणार्‍या गौरीला अचानक काय झालं? हे फोटो पाहून आम्हालाही अनेक प्रश्न पडले.

गौरी खानने मुस्लीम धर्म स्वीकारलाय का? शाहरूखने असं का केल. शाहरुखच्या फॅन्सना हे आवडेल का? किंग खान शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी खान. हिंदू मुस्लीम लव्ह स्टोरी देशभरात नेहमीच चर्चेत राहिली. मात्र हे फोटो पाहून सगळ्यांचा धक्का बसलाय. शाहरूखने गौरी खानचा धर्मपरिवर्तन केलंय का? काहीजण सोशल मीडियावर म्हणतायत की लग्नचा३३ वर्षानंतर शाहरूखने गौरी खानचा धर्मपरिवर्तन केलंय पण फोटोत दिसतय.

ते खऱ आहे का? धर्मावरून शाहरूखला अनेकदा ट्रोल करण्यात आलंय... तर त्याची पत्नी गौरी खानचं कौतुक केल़ जात. मात्र हे फोटो पाहून गौरी खान लाही ट्रोल केल़ जातंय.. या फोटोमध्ये सोशल मीडियात एकच खळबळ उडालीय. त्यामुळे या फोटोचं सत्य सांगणं गरजेचं आहे. आम्ही या फोटोची पडताळणी सुरू केली. पण त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

शाहरुख खानने लग्नाच्या 33 वर्षांनंतर पत्नी गौरी खानचं धर्मपरिवर्तन केलं. मक्कामध्ये जाऊन गौरीला हिंदू धर्मातून मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला. हा मेसेज आणि गौरीचा बुरख्यातील फोटो तुफान व्हायरल होतोय. या फोटोत मागे पाक खाना-ए-काबा दिसतोय. त्यामुळे अनेकांना शाहरुखने पत्नीचं धर्मपरिवर्तन केल्याचं वाटतंय. यामुळेच दोघांवर टीका केली जातेय. मात्र हे खरं आहे का? यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने फोटोची पडताळणी सुरू केली.

व्हायरल फोटोंची माहिती मिळवण्यासाठी रिव्हर्स सर्च इमेज करून पाहिली. मात्र, असे फोटो इतर कुठेही सापडले नाही.त्यामुळे आमच्या टीमने थेट शाहरूख खानच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन पडताळणी केली. तिथेही आमच्या हाती काही माहिती लागली नाही. तसंच शाहरूख आणि गौरीनेही माहिती शेअर केलेली नाही. मग हा नक्की काय प्रकार आहे याचा आम्ही रिसर्च केला त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

शाहरूखने गौरीचा धर्मपरिवर्तन केलेला नाही

व्हायरल फोटो एआयच्या माध्यमातून बनवलाय

गौरी खान ही हिंदू धर्माची आहे

गौरी आणि शाहरुखचा आंतरधर्मीय विवाह 25 ऑक्टोबर 1991 रोजी झाला

लग्नानंतरही गौरीने धर्म बदलला नाही

गौरी पती शाहरुख खानच्या इस्लाम धर्माचा आदर करते.

मात्र, एआयचा गैरवापर करून शाहरुख आणि गौरीला सोशल मीडियातून ट्रोल केलं जातंय. त्यामुळे आमच्या पडताळणीत शाहरूखने गौरीचं धर्मपरिवर्तन केल्याचा दावा असत्य ठरला.तुमच्या मोबाईलवर असे फोटो आल्यास लगेच विश्वास ठेवू नका. त्याची शहानिशा करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT