Emergency New Trailer : इंदिरा इज इंडिया! कौरवांविरुद्ध युद्धाची घोषणा…; कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'चा दुसरा ट्रेलर आऊट

Emergency New Trailer : कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'चा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात झालेल्या हिंसाचार आणि राजकीय गोंधळ दाखवण्यात आला आहे.
Kangana Ranaut Emergency New Trailer
Kangana Ranaut Emergency MovieSaam Tv
Published On

Emergency New Trailer : कंगना राणौतचा बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे वर्णन सर्वात वादग्रस्त नेत्या म्हणून करण्यात आले आहे. कंगनाने काही काळापूर्वी चित्रपटाचा नवीन ट्रेलर शेअर केला होता. नवीन ट्रेलर 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात झालेला हिंसाचार आणि राजकीय गोंधळावर आधारित आहे. तसेच, “इंदिरा इज इंडिया” ही इंदिरा गांधींची घोषणाही दाखवली आहे. ट्रेलरमध्ये संपूर्ण लक्ष त्यावेळच्या राजकीय नाट्यावर केंद्रित आहे.

'इमर्जन्सी'च्या नवीन ट्रेलरमध्ये जयप्रकाश नारायण (अनुपम खेर) यांचा तरुण अटलबिहारी वाजपेयी (श्रेयस तळपदे) यांच्या भाषणाच्या प्रतिभेला असलेला तीव्र विरोध दाखवण्यात आला आहे. याशिवाय फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ (मिलिंद सोमण), पुपुल जयकर (महिमा चौधरी) आणि जगजीवन राम (दिवंगत सतीश कौशिक) यांचीही झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

Kangana Ranaut Emergency New Trailer
Generation Beta : जनरेशन बीटाला सुरुवात, पहिल्या बाळाचा जन्म; कधी आणि कुठे? नाव ठेवलं खास...

कंगना राणौतने व्यक्त केला आनंद

'इमर्जन्सी'चा ट्रेलर रिलीज करताना, कंगना रणौतने या चित्रपटाविषयी म्हणाली, "आव्हानांनी भरलेल्या दीर्घ प्रवासानंतर, आमचा 'इमर्जन्सी' चित्रपट 17 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर येणार याचा मला आनंद आहे. ही कथा केवळ एका वादग्रस्त नेत्याची नाही तर अशा सर्व विषयांवर आधारित आहे जे आजही अत्यंत समर्पक आहेत.”

Kangana Ranaut Emergency New Trailer
Mukkam Post Devach Ghar : देवाच घर म्हणजे काय? ; 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटाचा टीजर लॉन्च!

चित्रपटात संविधानाची महानता दाखवण्यात आली

कंगना रणौत पुढे म्हणाली, “प्रजासत्ताक दिनाच्या एक आठवडा आधी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आपल्या राज्यघटनेची महानता दर्शवतो.” चित्रपटाला विरोध झाल्यानंतर जर्नेल सिंग भिंद्रनवा आणि खलिस्तानशी संबंधित सीन हटवण्यात आले आहेत. सीबीएफसीने ते तीन महिन्यांत रिलीज करण्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी हा चित्रपट 6 सप्टेंबरला रिलीज होणार होता. या चित्रपटात कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. कंगनाने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com