Mukkam Post Devach Ghar : देवाच घर म्हणजे काय? ; 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटाचा टीजर लॉन्च!

Mukkam Post Devach Ghar Teaser : लहान मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. काही प्रश्नांची उत्तर तर त्यांच्या पालकांना कधीच देता येत नाहीत असाच एक प्रश्न या 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटातील चिमुकली विचारत आहे.
Mukkam Post Devach Ghar Teaser
Mukkam Post Devach Ghar TeaserPR
Published On

Mukkam Post Devach Ghar : देवाचं घर म्हणजे काय? ते नक्की कुठे असत? यांसारखे विविध प्रश्न पडलेल्या एका लहान मुलीला तिचं उत्तर "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटातून मिळणार आहे. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीजर नुकताच लाँच करण्यात आला असून, हा चित्रपट ३१ जानेवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवालाही पत्र पोहोचेल अशा सध्या पण विचार करायला लावणाऱ्या कल्पनेतून सुरू होणाऱ्या टीजरमुळे "मुक्काम पोस्ट देवाचं घर" मनाला भिडणारी गोष्ट ही लहान मुलगी नक्कीच सांगणार असल्याचा अंदाज येत आहे. एका लहान मुलीला पडलेल्या प्रश्नाचं काय उत्तर असेल याचा शोध या चित्रपटातून घेण्यात आला आहे.

Mukkam Post Devach Ghar Teaser
Deva Teaser : 'हैदर'चा लूक, 'कबीर सिंग'चा राग; अंगावर काटा आणणार शाहिदच्या 'देवा' चित्रपटाचा टीझर Out

तसेच या चित्रपटात तिच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींची जोडही देण्यात आली आहे. अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीनं ही गोष्ट उलगडणार असून सहकुटुंब हा चित्रपट पाहता येणार आहे. त्यामुळे "मुक्काम पोस्ट देवाचं घर" हा चित्रपट येत्या ३१ जानेवारीपासून चित्रपटगृहात जाऊनच पाहायला हवा यात शंका नाही.

Mukkam Post Devach Ghar Teaser
Myra Vaikul : छोटी मायरा झळकणार 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात

मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार - महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे. मायराचा अवखळ अंदाज सविता मालपेकर आणि उषा नाडकर्णी यांची खमंग फोडणी त्याला प्रथमेश परब, मंगेश देसाई, कल्याणी मुळे,रेशम श्रीवर्धन यांची भक्कम साथ असल्यामुळे सहकुटुंब प्रेक्षकांना नक्कीच मेजवानी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com