Deva Teaser : 'हैदर'चा लूक, 'कबीर सिंग'चा राग; अंगावर काटा आणणार शाहिदच्या 'देवा' चित्रपटाचा टीझर Out

Deva Teaser Out : शाहिद कपूरचा मोस्ट अवेटेड 'देवा' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये शाहिद दमदार ॲक्शन अवतारात दिसत आहे.
shahid kapoor Deva Teaser
shahid kapoor Deva TeaserGoogle
Published On

Deva Teaser : देवा आला रे... शाहिद कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'देवा'चा टीझर रिलीज झाला आहे. बऱ्याच काळानंतर शाहिद मोठ्या पडद्यावर दमदार ॲक्शनसह दिसणार आहे. झी स्टुडिओज आणि रॉय कपूर प्रॉडक्शनच्या या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. काही काळापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर समोर आले होते, ज्यामध्ये शाहिद खूपच दमदार दिसत होता. 'देवा'च्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा टीझर शेअर केला आहे.

शाहिदच्या चाहत्यांची उत्कंठा वाढताना दिसत आहे, 'देवा'चा टीझर 52 सेकंदांचा आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. याची सुरुवात शाहिद कपूरच्या नेत्रदीपक चालीपासून होते. या चित्रपटात तो पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 31 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा टीझर शेअर करताना, निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की द, डे इज हियर, मचना चालू.

shahid kapoor Deva Teaser
Bigg Boss 18 : सलमान खानच्या बिग बॉसमध्ये राम चरण आणि कियारा अडवाणीची एंट्री; स्पर्धकांसोबत केली मस्ती, व्हिडीओ व्हायरल

शाहिद कपूरच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, 'देवा'मध्ये तो अतिशय अग्रेसिव्ह लुकमध्ये दिसत आहे आणि या आगामी चित्रपटातही भरपूर ॲक्शन पाहायला मिळणार असल्याचे त्याच्या टीझरवरून दिसून येते. या टीझरमध्ये शाहिद जबरदस्त स्टंट, फाईट सीन आणि ॲक्शन सीन करताना दिसत आहे. टीझरच्या शेवटी, बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या भिंतीवर बनवलेले एक पेंटिंग दाखवले आहे, ज्याच्या समोर शाहिद बंदूक घेऊन दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मल्याळम दिग्दर्शक रोशन एंड्रयूज करत आहेत. या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.

shahid kapoor Deva Teaser
Sky Force Trailer : 'जरा याद करो कुर्बानी...' दमदार डायलॉग्जबाजी सह अक्षय कुमारच्या स्काय फोर्सचा ट्रेलर प्रदर्शित

चाहत्यांनी उत्साह दाखवला

'देवा'च्या टीझरवर लोकांनी कमेंट करत उत्साह व्यक्त केला आहे. शाहिदच्या चाहत्यांसोबतच त्याचा भाऊ ईशान खट्टरनेही फायर इमोजीसह कमेंट केली आहे. एका यूजरने लिहिले की, याला आग लगा दी म्हणतात, या चित्रपटाला त्याच्या जुन्या 'कबीर सिंह' चित्रपटाशी जोडताना त्याने लिहिले की, 'कबीर सिंग इन पोलिस मोड'. देवा आधी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने येणार होता, पण शाहिदने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करून चित्रपटाची नवीन तारीख जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com