AR Rahman Birthday : देश-विदेशात स्टुडिओ अन् कोट्यवधींची मालमत्ता, सुरेल आवाजाने जगाला वेड लावणाऱ्या 'ए.आर. रहमान'ची एका गाण्याची फी किती?

AR Rahman Net Worth: आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा गायक 'ए.आर. रहमान'चा आज वाढदिवस आहे. तो लग्जरी लाइफस्टाइल जगत आहे. त्याची एकूण संपत्ती जाणून घेऊयात.
AR Rahman Net Worth
AR Rahman BirthdaySAAM TV
Published On

आपल्या सुरेल आवाजाने जगाला वेड लावणारा लोकप्रिय संगीतकार 'ए आर रेहमान'चा आज 58वा वाढदिवस आहे. नेहमी ए आर रेहमान (AR Rahman ) आपल्या सुरेल आवाजासाठी ओळखला जातो. मात्र अलिकडेच तो आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. लग्नाच्या 30 वर्षांनी 'ए आर रेहमान'ने पत्नी सायरा बानूसोबत घटस्फोट घेतला आहे.

'ए आर रेहमान'ने आजवर अनेक चित्रपटांसाठी हिट गाणी गायली आहेत. त्याची गाणी कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य करतात आणि त्यांच्या भावना ओल्या करून जातात. गायकाला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना जगातील कानाकोपऱ्यात आपल्या गाण्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याची गाणी आजच्या तरुण पिढीला खूप जास्त आवडतात.

'ए आर रेहमान' नेटवर्थ

'ए आर रेहमान'चे परदेशात अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये 'ए आर रेहमान'चा स्वतःचा एक स्टुडिओ देखील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'ए आर रेहमान'चे मुंबई, लंडनमध्ये म्युझिक स्टुडिओ आहेत. चित्रपटात एका गाण्यासाठी ए आर रेहमान 8 ते 10 कोटी रुपये मानधन घेतो. तर लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्यासाठी 3 ते 5 कोटी फी घेतो. त्याची अनेक शहरांमध्ये संपत्ती आहे.

'ए आर रेहमान'कडे आलिशान कार देखील आहेत. यात मर्सिडीज, जग्वार यांसारख्या कोटींच्या गाड्यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गायक 'ए आर रेहमान' तब्बल संपत्ती 2,000 कोटी रुपयांच्यावर आहे. तो जगातील श्रीमंत संगीतकारांपैकी एक आहे. तो अनेक ब्रँडसोबतही कनेक्ट आहे.

AR Rahman Net Worth
HBD Deepika Padukone: एकेकाळी आयुष्य संपवायचा विचार ते बॉलिवूडची 'मस्तानी', कसा होता दीपिकाचा प्रवास? संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल चकित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com