
ए. आर. रहमान आज आपला ५७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. ए. आर. रहमान आपल्या गाण्यांसोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना फार कमी माहिती आहे. ए आर रहमान हे नाव आज जगभरात प्रसिद्ध आहे. ए आर रहमानच्या सुमधूर आवाजाचे असंख्य चाहते आहेत. रहमानने त्याच्या करिअरमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत.
ए आर रहमानचा जन्म एका हिंदू कुटुंबात झाला. मात्र अनेक वर्षांनी ए आर रहमान धर्म बदलला. ए आर रहमानचं खरं नाव दिलीप कुमार आहे. लहानपणीच ए आर रहमानने त्याचं नाव देखील बदललं आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घ्या.
हिंदू कुटुंबात जन्मलेल्या ए आर रहमान धर्मांतर केल्याने चांगलाच चर्चेत राहिला होता. त्याने वयाच्या २३ व्या वर्षी इस्लाम धर्म स्विकारला. ए आर रहमानच्या लहान बहिणीची तब्येत बिघडली. अनेक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनीही जगण्याची आशा सोडली होती. यानंतर बहिणीसाठी ए आर रहमाननी अनेक मंदिरे, मशिदींमध्ये जाऊन प्रार्थना केली. मात्र तेव्हा एका सूफी संताने तिला बरे केले त्यावेळेपासून ए आर रहमानने कुटुंबासह इस्लाम धर्म स्विकारला.