राज्यातल्या अनेक मुख्य शहरांमध्ये आज लाडक्या गणरायाला (Ganeshotav 2023) निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांमध्ये लाडक्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीची चांगलीच धुम पाहायला मिळत आहे. भव्य दिव्य रांगोळी, ढोल- ताशा पथक, लाडक्या भक्तांची गर्दी, फुलांचा सडा यामुळे विसर्जनाची शोभा आणखी वाढली. सध्या पुण्यामध्ये मराठी सेलिब्रिटींमध्ये कमालीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. नुकतंच सकाळ टीमने काही मराठी कलाकारांसोबत संवाद साधला आहे.
पुण्याच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत मराठी सेलिब्रिटीही पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत कलावंत ढोलपथकाने वादन केलंय. विसर्जनाचे औचित्य सकाळ डिजीटल टीमने कलावंत ढोलपथकातील सदस्य आणि लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव सोबत खास बातचीत केलीय.
यावेळी तो मुलाखतीत म्हणाला, “मी पुण्यातल्या ‘कलावंत’ या ढोल पथकामध्ये गेल्या १० वर्षांपासून वादन करतोय. वादन करताना खुप चांगलं वाटतं. इथे आल्यावर अंगात एक वेगळी एनर्जी संचारते. वादन केल्यानंतर आमच्या अंगात डबल उत्साह मिळतो. गणेशोत्सव संपूर्ण राज्यात साजरा होतोय, गणपती बाप्पा मोरया...”
यावेळी पुण्याच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये, सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री श्रृती मराठे, तेजस्विनी पंडीत, अनुजा साठे, आस्ताद काळे, शाश्वती पिंपळीकर, दिप्ती देवी सह इत्यादी कलाकार सहभागी होते. अनेक मराठी सेलिब्रिटी एकत्र येत पुण्यात २०१४ मध्ये ढोलताशा पथक सुरु केले. यावेळी या ढोलताशा पथकाची सुरुवात अभिनेता सौरभ गोखलेने पुढाकार घेऊन ‘कलावंत’ पथकाची सुरुवात केली अशी माहिती आहे. यंदाचे हे या कलाकारांचे दहावे वर्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.